news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड मनपा निवडणूकः हरकतींच्या तपासणीसाठी आयोगाने दिली ‘डेडलाईन’! आता अंतिम मतदार यादी १५ डिसेंबरला

पिंपरी-चिंचवड मनपा निवडणूकः हरकतींच्या तपासणीसाठी आयोगाने दिली ‘डेडलाईन’! आता अंतिम मतदार यादी १५ डिसेंबरला

उप आयुक्त सचिन पवार यांची माहिती; अचूकतेसाठी हरकती व सूचनांच्या परीक्षणाला मुदतवाढ. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महापालिका निवडणूक २०२५: प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्धीस १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

 

 

राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ वाढवला; मतदान केंद्रनिहाय यादी २७ डिसेंबरला होणार प्रसिद्ध

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि.१० डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय विभाजित प्रारूप मतदार यादीवरील प्राप्त हरकती व सूचनांच्या परीक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची पूर्वनिर्धारित तारीख १० डिसेंबर २०२५ होती.

राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार, पुढील प्रक्रिया निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यात येणार आहेत:

  • प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्धी: १५ डिसेंबर २०२५

  • मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्धी: २० डिसेंबर २०२५

  • मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्धी: २७ डिसेंबर २०२५

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अ, ब, क, ड, इ, ग व ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच सावित्रीबाई फुले स्मारकातील कार्यान्वित कक्षामध्ये नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना निर्धारित मुदतीत सादर केल्या आहेत.

या प्राप्त अर्जांचे परीक्षण प्रगतीपथावर असून, वाढीव मुदतीमुळे (१५ डिसेंबरपर्यंत) प्राप्त प्रकरणांची तपशीलवार पडताळणी करणे आणि प्रभागनिहाय यादीची अचूकता सुनिश्चित करणे अधिक सोपे होणार आहे.

सचिन पवार, उप आयुक्त निवडणूक:

हरकती व सूचनांच्या परीक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मिळाल्याने निवडणुकीच्या तयारीची पुढील कार्यवाही नियुक्त कालमर्यादेत अधिक अचूकपणे पूर्ण करता येईल.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!