news
Home पिंपरी चिंचवड अभिमानास्पद! श्रेया तरस राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार; रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा डंका

अभिमानास्पद! श्रेया तरस राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार; रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा डंका

इयत्ता सातवीत शिकणाऱ्या श्रेयाने फलंदाजी आणि गोलंदाजीत दाखवली चमक; पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे आणि सर्व विश्वस्तांनी दिल्या शुभेच्छा. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

१३ वर्षांच्या श्रेया तरसची महाराष्ट्र १७ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड; एस. बी. पाटील पब्लिक स्कूलची पहिली राष्ट्रीय खेळाडू

 

 

अहिल्यानगर विभागीय क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू कामगिरीनंतर यश; शाळा व्यवस्थापनाकडून कौतुक

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि.१० डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज: 

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील खेळाडू श्रेया तरस हिची महाराष्ट्र १७ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघात निवड झाली आहे. या संघात स्थान मिळवणारी श्रेया तरस ही सर्वात कमी वयाची (१३ वर्षे ६ महिने) खेळाडू ठरली आहे. विशेष म्हणजे, श्रेया तरस ही एस. बी. पाटील पब्लिक स्कूलची राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारी पहिली खेळाडू आहे.

अहिल्यानगर, शिर्डी येथे झालेल्या विभागीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला होता. या स्पर्धेत झालेल्या तीन डावांमध्ये इयत्ता सातवीत शिकणाऱ्या श्रेया तरस हिने उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजी करत अष्टपैलू खेळ केला.

या स्पर्धेतील तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची पुण्यातील इतर दोन मुलींसह महाराष्ट्राच्या एकूण १६ विद्यार्थिनींमध्ये निवड झाली आहे. पुढील काळात होणाऱ्या राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत श्रेया तरस महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

श्रेया तरस हिला प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापक शुभांगी कुलकर्णी, क्रीडा शिक्षक चंद्रकांत ठोंबरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी श्रेया तरस हिचे अभिनंदन केले आणि राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!