news
मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर आनंदच; वडेट्टीवारांचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर अन् आरएसएसवर घणाघाती हल्लारस्ते अपघात पीडितांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाचे कडक पाऊल; विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल पंपांवर इंधन नाकारण्याच्या योजनेचा विचार करण्याचे निर्देशपरदेशातील प्रगत शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यासासाठी ‘फार्मर आयडी’धारक शेतकऱ्यांना मिळणार संधीपोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचा गुन्हेगारांना सज्जड इशारा; अवैध दारू व्यावसायिकांना ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत दणकासांगवीत ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस आणि विविध गुणगौरव सोहळा उत्साहात; ज्येष्ठांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा महासंघाचा ठाम निर्धार
Home पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचा गुन्हेगारांना सज्जड इशारा; अवैध दारू व्यावसायिकांना ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत दणका

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचा गुन्हेगारांना सज्जड इशारा; अवैध दारू व्यावसायिकांना ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत दणका

सांगवी, हिंजवडी अन् उत्तर महाळुंगेतील अट्टल गुन्हेगार येरवडा व हरसुल मध्यवर्ती कारागृहात रवानगी; पोलीस प्रशासनाचा धडक मास्टर प्लॅन | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड पोलिसांचा अवैध धंद्यांवर सर्जिकल स्ट्राईक! ३ सराईत गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. अन्वये कारवाई; १ वर्षासाठी मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ५ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत दहशत माजवणारे, बेकायदेशीर दारू विक्री करणारे आणि वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात पोलीस प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यान्वये धडक कारवाई करत ३ अट्टल गुन्हेगारांना प्रत्येकी १ वर्षासाठी मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी केले आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अवैध दारू माफ्यांचे जाळे उध्वस्त करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हा मास्टर प्लॅन तयार केला आहे.

१. कोंडीबा आडेप्पा कांबळे (वय ३७ वर्षे, रा. सुदर्शन नगर, पिंपळे गुरव, पुणे) सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर दारू विक्रीचे तब्बल ०९ गुन्हे दाखल आहेत. त्याची रवानगी हरसुल मध्यवर्ती कारागृह (छत्रपती संभाजीनगर) येथे करण्यात आली आहे.

२. जीवन मारुती राजपूत (वय ४८ वर्षे, रा. गोनवडी, ता. खेड, जि. पुणे) उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू तयार करणे व विकणे यांसारखे १४ गंभीर गुन्हे याच्यावर नोंद आहेत. यालाही हरसुल मध्यवर्ती कारागृह (छत्रपती संभाजीनगर) येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.

३. धनराज सोमाजी नट (वय ३५ वर्षे, रा. माणरोड, हिंजवडी, पुणे) हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू विक्रीचे ०४ गुन्हे असलेला हा सराईत गुन्हेगार आहे. याची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृह (पुणे) येथे करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी स्पष्ट केले की, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैध दारू व्यवसायाला पूर्णपणे ‘झिरो टॉलरन्स’ आहे. समाजातील शांतता आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या गुन्हेगारांची अजिबात गय केली जाणार नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  सन २०२५ मध्ये एम.पी.डी.ए. कायद्यान्वये ३५ गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. सन २०२६मध्ये (जानेवारी ते जुलै) आतापर्यंत ११ सराईत गुन्हेगारांना एम.पी.डी.ए. अंतर्गत तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह-आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त संदीप आटोळे, श्वेता खेडकर, प्रदीप जाधव, रोहिदास पवार (गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सुदर्शन राठोड, मनीषा कदम, प्रिया डमाळे आणि विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी (सांगवी), बालाजी पांढरे (हिंजवडी), दिगंबर सूर्यवंशी (उत्तर महाळुंगे) आणि पी.सी.बी. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!