news
पूरणनगरमध्ये वाळलेल्या झाडांमुळे मृत्यूची टांगती तलवार; वारंवार तक्रार करूनही मनपा उद्यान विभागाचे ‘डोळेझाक’!पिंपळे सौदागरच्या लिनिअर गार्डनमध्ये रंगला भक्ती आणि योगाचा अनोखा संगम! ‘द आर्ट ऑफ लिविंग’ आणि भाजपचा संयुक्त उपक्रमरहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेत
Home पिंपरी चिंचवड अल्फा लवाल कंपनीच्या ‘तारीख पे तारीख’ भूमिकेवर कामगारांचा संताप! यशवंतभाऊ भोसले यांनी कंपनीला दिले पाच दिवसांचे ‘अल्टिमेटम’

अल्फा लवाल कंपनीच्या ‘तारीख पे तारीख’ भूमिकेवर कामगारांचा संताप! यशवंतभाऊ भोसले यांनी कंपनीला दिले पाच दिवसांचे ‘अल्टिमेटम’

आंदोलन तात्पुरते स्थगित, पण न्याय न मिळाल्यास थेट मुख्यमंत्र्यांकडे साकडे घालणार; नंदू आप्पा कदम, दिनेश पाटील, दिपक पाटील यांची उपस्थिती. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘अल्फा लवाल’ कामगार प्रश्नावर तोडगा नाहीच! यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात बैठक; आंदोलनाची पुढील दिशा ठरली

 

 

अवैधपणे काढलेल्या ४०२ कामगारांना कामावर घेण्याची मागणी; पाच दिवसांनी पोलीस, व्यवस्थापनासोबत बैठक होणार

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि.१० डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

अल्फा लवाल लिमिटेड कंपनीतील तब्बल ४०२ कामगारांना अकरा वर्षांपूर्वी बेकायदेशीररित्या कामावरून काढून टाकल्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली संत तुकाराम हॉल (संत तुकाराम नगर), पिंपरी येथे मंगळवारी (दि. ९ डिसेंबर २०२५) बैठक संपन्न झाली. या बैठकीत कामगारांना कामावर घेणे आणि संघटनेचा नामफलक लावण्या संदर्भात लाक्षणिक उपोषणाची दिशा ठरवण्यात आली. या बैठकीला संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी नंदू आप्पा कदम, दिनेश पाटील, दिपक पाटील यांसह महाराष्ट्रातून आलेले ३०० कामगार उपस्थित होते.  बैठकीच्या सुरुवातीला नुकतेच निधन झालेले श्रमिक नेते डॉ. बाबा आढाव यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मौन पाळण्यात आले.

दापोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले आणि अल्फा लवाल लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापनाची बैठक पाच दिवसांनंतर पोलिसांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे आज (दि. ९) होणारे लाक्षणिक उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. यावेळी कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी कंपनीच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले:

  • न्यायालयातील विलंब: “तेरा वर्ष न्यायालयात तारखांवर तारखा चालू आहेत, त्यामुळे किती कामगार मरतात याची वाट कंपनी बघतेय का? असा संशय निर्माण झाला आहे.” श्री रामाप्रमाणे १४ वर्षांचा वनवास लवकरच संपून न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • कामावर घेण्याची मागणी: न्यायालयात “तारीख पे तारीख” चालू राहणार असेल तर कंपनीने कामगारांना कामावर घेऊन कायमस्वरूपी कामगारांप्रमाणे ८० ते ९० हजार वेतन द्यावे.

  • मृत कामगारांच्या वारसांना संधी: निकाल लागल्यानंतर मृत्यू झालेल्यांच्या वारसांना कामावर घ्यावे आणि निकाल लवकर लागून कामगारांना वेतनाचा फरक मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.

  • मुख्यमंत्र्यांची भेट: पाच दिवसांनी होणाऱ्या बैठकीत कंपनीने कामगारांना कामावर घेतले नाही तर आंदोलन करण्याची हमी पोलिसांनी दिली आहे. तसेच, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अल्फा लवाल लिमिटेड कामगारांचा प्रश्नासह अनेक कामगारांचे प्रश्न उपस्थित करून मार्गी लावण्याचे साकडे घालणार असल्याचे मत यशवंतभाऊ भोसले यांनी व्यक्त केले.

नंदू आप्पा कदम म्हणाले की, “कामगारांनो काळजी करण्याची गरज नसून कामगार क्षेत्रातील निस्वार्थी नेतृत्व यशवंतभाऊ भोसले आपल्या सोबत उभे आहेत. त्यांनी नुकतेच तीन वर्ष कामावरून काढून टाकलेल्या सेवा विकास बँकेतील कामगारांना एक ते तीन लाख रुपये मिळवून दिले आहेत, हा त्यांचा विजय वाखाण्याजोगा आहे.” यशवंतभाऊ भोसले हे कामगारांसाठी लढणारे वादळ आहेत, त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कामगारांनी त्यांच्यासोबत तटस्थपणे उभे राहावे, तरच न्याय मिळेल.

बैठकीत उपस्थित कामगारांच्या होकारानंतरच कंपनी व्यवस्थापनाला पाच दिवसांची मुदत देण्यात आली. तसेच संघटनेचा फलक लावण्याचेही यावेळी ठरवण्यात आले. पोलिसांनी घेतलेल्या जबाबदारीनुसार त्यांच्या सूचनेमुळे आंदोलन स्थगित करण्यात आले असून, भविष्यात होणाऱ्या आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी केले.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!