news
Home पिंपरी चिंचवड महिला सक्षमीकरणाचे ‘अमरावती मॉडेल’! लाडकी बहिण योजनेतून मिळणाऱ्या निधीचे नियोजन करण्यासाठी राज्यात प्रथमच पतसंस्था

महिला सक्षमीकरणाचे ‘अमरावती मॉडेल’! लाडकी बहिण योजनेतून मिळणाऱ्या निधीचे नियोजन करण्यासाठी राज्यात प्रथमच पतसंस्था

महिलांचे आर्थिक नियोजन चोख, त्यामुळे पतसंस्थेची शिस्त वाढेल- जिल्हाधिकारी आशिष येरेकर; उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा नियोजनमधून ६ कोटींचा निधी. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘लाडकी बहिण’ योजनेतील लाभार्थ्यांची राज्यात पहिली जिल्हास्तरीय सहकारी पतसंस्था स्थापन!

 

 

अमरावतीमध्ये ७,५०० सभासद सदस्य; २१ लाख रुपयांचा निधी जमा; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नोंदणी प्रमाणपत्र प्रदान

अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि.१० डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

राज्य शासनाच्या ‘लाडकी बहिण योजना’ अंतर्गत मिळणाऱ्या १५०० रुपये आर्थिक सहाय्याचा योग्य विनियोग करण्याच्या उद्देशाने अमरावती जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांची जिल्हास्तरीय सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते या पतसंस्थेच्या प्रवर्तकांना नोंदणीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. जिल्हास्तरावर लाभार्थ्यांची पतसंस्था नोंदणी होण्याची ही राज्यातील पहिली घटना आहे.

राज्य शासनाच्या ‘लाडकी बहिण योजना’ कार्यान्वित झाल्यानंतर महिलांनी हे पुढचे पाऊल टाकले आहे. महिलांनी एकत्र येऊन नोंदणी केलेल्या या सहकारी पतसंस्थेमध्ये सुरुवातीलाच ७ हजार ५०० सभासद सदस्य झाले असून, त्यात २१ लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. सभासद संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पतसंस्थेच्या प्रवर्तकांना संस्था नोंदणीचे प्रमाणपत्र प्रदान करताना सांगितले की, महिलांची पतसंस्था नोंदणी होणे ही ऐतिहासिक बाब आहे.

  • आर्थिक शिस्त: या बँकेच्या माध्यमातून ‘लाडकी बहिण योजनेतून’ मिळणारे सहाय्य गोळा होणार आहे. महिलांचे आर्थिक नियोजन चोख असल्यामुळे पतसंस्थेची आर्थिक शिस्त वाढीस लागेल.

  • उद्योजकतेला प्रोत्साहन: महिलांमधील उद्योजकता वाढीस लागावी म्हणून जिल्हा नियोजनमधून ६०० बचतगटांना प्रत्येकी एक लाख याप्रमाणे ६ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात पहिली प्राथमिक सहकारी सेवा संस्था उभारण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही आशिष येरेकर यांनी केले.

यावेळी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. रंजन वानखडे, उपनिबंधक कार्यालयाचे सहायक संचालक अनिरूद्ध राऊत उपस्थित होते.

यावेळी लाडकी बहिण पतसंस्थेच्या अध्यक्ष रजनी भोंडे, उपाध्यक्ष रेशमा सरदार, कोषाध्यक्ष विद्या धिकार, सचिव ज्योत्स्ना चांगोले, वैशाली चौधरी, सुनिता थोटे, मिना कडव, अनिता वैद्य, पद्मा सरदार, ज्योती बोरकर, भारती वानखडे, संमिता विरूळकर, विद्या काळे, रेखा कासदेकर, शाहिन बांनो फिरोज खान, कौसल्या इखे, शीतल डेहनकर आदी उपस्थित होते.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!