news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड आकुर्डीत ‘ठाकरे शिवसेना चषक’ स्पर्धेवरून वाद! युवासेना उपशहरप्रमुख निखिल उमाकांत दळवी यांना ‘गिरीश कुटे’ यांच्याकडून धक्काबुक्की आणि जीवे मारण्याची धमकी

आकुर्डीत ‘ठाकरे शिवसेना चषक’ स्पर्धेवरून वाद! युवासेना उपशहरप्रमुख निखिल उमाकांत दळवी यांना ‘गिरीश कुटे’ यांच्याकडून धक्काबुक्की आणि जीवे मारण्याची धमकी

महानगरपालिकेकडून भाड्याने घेतलेला भूखंड 'आमच्या मालकीचा' असल्याचे सांगून दादागिरी; निगडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल. (© २०२म् २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

धमकी आणि दादागिरी प्रकरणी कठोर कारवाई करा! युवासेना उपशहरप्रमुखाने पोलीस आयुक्तांकडे केली लेखी तक्रार

 

 

महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडावर क्रिकेट स्पर्धा आयोजित करताना गिरीश गोपाळ कुटे यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची दिली धमकी

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि.१० डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना उपशहरप्रमुख निखिल उमाकांत दळवी यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. आकुर्डी येथील विठ्ठलवाडी परिसरात महानगरपालिकेकडून भाड्याने घेतलेल्या भूखंडावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करताना गिरीश गोपाळ कुटे नावाच्या व्यक्तीने दादागिरी करत शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप निखिल उमाकांत दळवी यांनी केला आहे.

  • आयोजन: निखिल उमाकांत दळवी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ठाकरे शिवसेना चषक हाफ पीच क्रिकेट टूर्नामेंट स्पर्धा आयोजित केली आहे.

  • जागेचे आरक्षण: आकुर्डीमधील विठ्ठलवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील संत तुकाराम महाराज पालखी तळ हा आरक्षित भूखंड त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाकडून १० ते १५ डिसेंबर या पाच दिवसांसाठी भाडेतत्त्वावर घेतला आहे. यासाठी १३,०८० रुपये भाडे भरल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

  • धमकीची घटना: मंगळवार, दिनांक ०९/१२/२०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास निखिल उमाकांत दळवी हे मंडपवाले आणि सहकाऱ्यांसोबत जागेची मोजमाप घेण्यासाठी गेले असता, तिथे गिरीश गोपाळ कुटे आले. त्यांनी निखिल उमाकांत दळवी यांना दादागिरी करण्यास सुरुवात केली, शिवीगाळ केली आणि तीन वेळा धक्का देऊन ढकलून दिले.

  • जीवे मारण्याची धमकी: गिरीश गोपाळ कुटे यांनी हा भूखंड “आमच्या मालकीचा आहे, आम्हाला विचारल्याशिवाय इथे कोणताही कार्यक्रम करायचा नाही, मारणार पण आणि मारून टाकणार पण” अशी धमकी दिली. त्यांनी निखिल उमाकांत दळवी यांना “तुम्ही इथं पोटभरासाठी बाहेरून आलेले भाडेकरू आहात, नीट राहायचं नाहीतर सांगतो तुम्हाला,” असे धमकावले.

निखिल उमाकांत दळवी यांनी तात्काळ रात्री ११२ या पोलीस तक्रार क्रमांकावर १०.१० वाजता फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी निगडी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार निखिल उमाकांत दळवी यांनी निगडी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

निखिल उमाकांत दळवी यांनी पोलीस आयुक्तांना विनंती केली आहे की, गिरीश गोपाळ कुटे यांच्याकडून माझ्या जीवितास धोका आहे. भविष्यात माझ्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्यासाठी गिरीश गोपाळ कुटे यांना जबाबदार धरावे. या घटनेची गंभीर दखल घेऊन, योग्य ती कायदेशीर कारवाई करून, दखलपात्र गुन्हा दाखल करावा.

(सोबत काल दिलेल्या एन सी आर तक्रार कॉफीची प्रत जोडण्यात आली आहे.)


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!