मोर्शी खुल्या कारागृहात बंद्यांना ‘मानवी हक्क आणि संरक्षण’ विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन
आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त कार्यक्रम; बंद्यांना जीवनाचे मूलभूत हक्क आणि कर्तव्यांची माहिती
अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि.१२ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील खुल्या कारागृहात बुधवार, दि. १० डिसेंबर २०२५ रोजी बंद्यांसाठी ‘मानवी हक्क आणि संरक्षण’ या विषयावर कायदेविषयक जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून राज्य विधी सेवा प्राधिकरण, राज्य मानवी हक्क आयोग आणि कारागृह विभाग यांच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला व्ही. बी. वानखडे, एस. व्ही. खांडेकर, डी. एस. वमने आणि कारागृह अधीक्षक एस. एस. हिरेकर उपस्थित होते.
न्यायरक्षक कार्यालयाचे ॲड. अमित सहारकर यांनी कारागृहातील बंद्यांना त्यांचे हक्क व कर्तव्ये याविषयी सविस्तर माहिती दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. एस. वमने यांनी बंद्यांना खालील मूलभूत हक्कांबद्दल माहिती दिली:
-
जगण्याचा अधिकार
-
पिण्याचे पाणी व जेवणाचा अधिकार
-
जीविताची सुरक्षा
-
कायदेविषयक मदत
-
मनोरंजन
-
शिक्षण
-
आरोग्याचा अधिकार
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. अंकुश इंगळे यांनी केले, तर कारागृहाचे कृषी पर्यवेक्षक एन. व्ही. पकडे यांनी सूत्रसंचालन केले. कारागृह अधीक्षक एस. एस. हिरेकर यांनी आभार मानले.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
