news
Home पिंपरी चिंचवड दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगारांचे ‘पिंपरी मॉडेल’! खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि खंडणी मागणाऱ्या ४ टोळ्यांविरुद्ध ‘मोका’

दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगारांचे ‘पिंपरी मॉडेल’! खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि खंडणी मागणाऱ्या ४ टोळ्यांविरुद्ध ‘मोका’

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत १७९ आरोपींवर कडक कारवाई; चिखली, दिघी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांचा समावेश. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड पोलिसांची गुन्हेगारी टोळ्यांविरोधात मोठी मोहीम! विकी जाधव, राहुल लोहार, विक्रांत देवकुळे, अमित पठारे टोळीवर ‘मोका’ अंतर्गत कारवाई

 

 

गुन्हेगारीवर बारीक लक्ष ठेवून ‘मोका’ अंतर्गत २९ गुन्हेगारांवर कारवाई; अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांचे आदेश

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि.१२ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज: 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील संघटित गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कडक पाऊले उचलली आहेत. याअंतर्गत, पोलीस आयुक्तलयातील ३५ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण १७९ आरोपींवर आजपर्यंत ‘मोका’ (MOCA – Maharashtra Control of Organised Crime Act, 1999) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

याच अनुषंगाने, नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आणखी चार टोळ्यांवर ‘मोका’ कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शरीरविरोधात, मालमत्ता विरोधात गुन्हे करणारे, खंडणी मागणारे, अंमली पदार्थांची विक्री करणारे, दंगा करून तोडफोड करणारे, बेकायदेशीर अग्निशस्त्रे बाळगणारे आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

यानुसार, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी खालील चार गुन्ह्यांतील आरोपींवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९’ (MOCA) अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश पारित केले आहेत:

१. चिखली पोलीस स्टेशन (गु.र.नं. ६११/२०२५)

  • टोळी प्रमुख व साथीदार: अनिरुद्ध उर्फ बाब्या उर्फ विकी राजू जाधव (वय २८, रा. जाधव वस्ती, रावेत) (टोळी प्रमुख), सोहन राजू चंदेलिया, पद्ममन राजकुमार जवळगे, यश उर्फ गोंड्या आकाश खंडागळे, अभिषेक उर्फ बकासूर चिमाजी पवार, शुभम गोरखनाथ चव्हाण, अनिकेत अशोक बारथे, अश्विन सुधीर गायकवाड, यशपालसिंग अरविंद सिंग देवडा आणि ५ विधीसंघर्षित बालके.

  • गुन्हा: खुनाचा प्रयत्न, आर्म्स ॲक्टसह भा.न्या.सं. कलम ३१० (४), ३१०(५) अंतर्गत गुन्हा दाखल.

  • नोंद: या टोळी प्रमुख आणि त्याच्या साथीदारांवर एकूण १५ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आहे.

२. एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन (गु.र.नं. ५८९/२०२५)

  • टोळी प्रमुख व साथीदार: राहुल आप्पासाहेब लोहार (वय २७, रा. चंदनवाडी, उरळी कांचन) (टोळी प्रमुख), ऋतिक प्रकाश गायकवाड, आकाश दिनकर गायकवाड, गणेश बबन वहिले, शिवतेज ज्ञानेश्वर ठाकरे.

  • गुन्हा: भा.न्या.सं. कलम १०९, १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, १११(२)(ब), १११(४), आर्म्स ॲक्टसह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ३, ७ अंतर्गत गुन्हा दाखल.

  • नोंद: या टोळी प्रमुख आणि त्याच्या साथीदारांवर एकूण १० गंभीर गुन्हे केल्याची नोंद आहे.

३. दिघी पोलीस स्टेशन (गु.र.नं. ५०२/२०२५)

  • टोळी प्रमुख व साथीदार: विक्रांत उर्फ सरडा प्रकाश देवकुळे (वय २४, रा. गणेश नगर, बोपखेल) (टोळी प्रमुख), सूरज राजू चव्हाण, साहील उर्फ विश्वास मुकेश लोट, शुभम सुमित डिगिया.

  • गुन्हा: भा.न्या.सं. कलम १०९, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल.

  • नोंद: या टोळी प्रमुख आणि त्याच्या साथीदारांवर एकूण ०७ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आहे.

४. दिघी पोलीस स्टेशन (गु.र.नं. ५७७/२०२५)

  • टोळी प्रमुख व साथीदार: अमित जीवन पठारे (वय ३३, रा. पठारे मळा, चऱ्होली बुद्रुक) (टोळी प्रमुख), विक्रांत सुरेश ठाकूर, सुमित फुलचंद पटेल, आकाश सोमनाथ पठारे, सोमनाथ प्रकाश पाटोळे, किसन उर्फ महाराज ज्ञानोबा तातकीर.

  • गुन्हा: भा.न्या.सं. कलम १०३(१), २३८, ४९, ३(५), आर्म्स ॲक्ट कलम ३(२५), ५(२७), महा. पोलीस अधि. कलम ३७(१)(३)१३५ अंतर्गत गुन्हा दाखल.

  • नोंद: या टोळी प्रमुख आणि त्याच्या साथीदारांवर एकूण ०७ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आहे.

वरील चारही टोळ्यांचे प्रमुख आणि त्यांचे साथीदार यांनी स्वतःची संघटित टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करत, किंवा हिंसाचाराची धमकी देऊन, किंवा धाकदपटशहा दाखवून अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने गुन्हे केले आहेत. हे गुन्हे प्रामुख्याने चिखली, निगडी, शिरगाव, रावेत, चिंचवड, वाकड, देहूरोड, एमआयडीसी भोसरी, दिघी, हिंजवडी, दापोडी, सांगवी, आळंदी, विश्रांतवाडी, खडकवी, कोंढवा, उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत खून, दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, दंगा करून तोडफोड करणे, गंभीर दुखापत, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे, अंमली पदार्थ विक्री करणे, चोरी, अपहरण अशा गंभीर स्वरूपाचे आहेत.

पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी ‘मोका’ कायद्याच्या कलमांतर्गत समावेश करण्याचे आदेश दिले आहेत.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप आयुक्त मारुती जगताप (परी-३), पोलीस उप-आयुक्त शिवाजी पवार (गुन्हे), सहा. पोलीस आयुक्त विशाल हिरे (गुन्हे १) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत वपोनि विठ्ठल साळुंखे (चिखली पो.स्टे.), वपोनि गणेश जामदार (एमआयडीसी भोसरी पो.स्टे.), वपोनि प्रमोद वाघ (दिघी पो.स्टे.), वपोनि रूपाली बोबडे (पी.सी.बी. गुन्हे शाखा), सपोनि सचिन चव्हाण (पी.सी.बी. गुन्हे शाखा), पोहवा व्यंकप्पा कारभारी (पी.सी.बी. गुन्हे शाखा), पोहवा कुमार कदम (चिखली पो.स्टे.), पोहवा निलेश अरगडे (एमआयडीसी भोसरी पो.स्टे.), पोहवा शरद विंचू, पोहवा शशिकांत पवार (दिघी पो.स्टे.) यांच्या पथकाने केली.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!