शहर स्वच्छता आणि सौंदर्यीकरण उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी! अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते सन्मान
सखुबाई गवळी उद्यान आणि सुदर्शन चौक परिसराचा चेहरामोहरा बदलला; नागरिकांकडून महापालिकेच्या कामाचे कौतुक
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि.१२ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड शहरात स्वच्छता आणि परिसर सौंदर्यीकरणाची उत्तम अंमलबजावणी करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा शुक्रवारी (दि. १२ डिसेंबर २०२५) विशेष सन्मान करण्यात आला. उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहाय्यक आयुक्त अमित पंडित यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत महापालिका शहर स्वच्छ ठेवण्यासोबतच ते आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. शहरातील विविध ठिकाणी असलेला कचरा हटवून त्याठिकाणी सौंदर्यीकरण केल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराचे रूप आणखी खुलत असून, नागरिकांकडूनही या कामाचे कौतुक केले जात आहे.
परिसर सौंदर्यीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आरोग्य विभागाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
-
“इ” क्षेत्रीय कार्यालय (प्रभाग ०५): येथील सखुबाई गवळी उद्यान परिसराचे आकर्षक सौंदर्यीकरण करण्यात आले.
-
“ड” क्षेत्रीय कार्यालय (प्रभाग २९): येथील सुदर्शन चौक, पिंपळे गुरव येथील सुंदर कलात्मक बदल लक्षणीय ठरला आहे.
या दोन्ही ठिकाणी आकर्षक आणि सुव्यवस्थित मांडणीमुळे परिसर चैतन्यमय झाला आहे.
परिसर सौंदर्यीकरणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या खालील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला:
-
सहाय्यक आरोग्याधिकारी: राजेश भाट, शांताराम माने, श्रीराम गायकवाड
-
प्रभारी सहाय्यक आरोग्याधिकारी: अतुल सोनवणे
-
मुख्य आरोग्य निरीक्षक: योगेश फल्ले, शंकर घाटे
-
आरोग्य निरीक्षक: रश्मी तुंडलवार, कोमल फर्डे, खंडेराव बैलकवाड, प्रणय चव्हाण, शैलेंद्रसिंग तंवर, गौरव गायकवाड, विकास शिरवळ
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

