news
Home पिंपरी चिंचवड जनगणना २०२७: उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पूर्ण केली ऑनलाईन स्वगणना! शहराला दिले सहभागाचे आवाहन

जनगणना २०२७: उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पूर्ण केली ऑनलाईन स्वगणना! शहराला दिले सहभागाचे आवाहन

शाश्वत विकासासाठी अचूक आकडेवारी गरजेची; प्रगणकांना सहकार्य करण्याचे पिंपरी-चिंचवडकरांना विनंती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार; स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला गती

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ५ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: देशातील अत्यंत महत्त्वाच्या जनगणना २०२७ मोहिमेला महाराष्ट्रात १ मे पासून सुरुवात झाली आहे. या मोहिमेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. शर्मिला राजेंद्र बाबर यांनी स्वतः ऑनलाईन स्वगणना (Self Enumeration) पूर्ण करून सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या या पुढाकारामुळे शहरातील नागरिकांमध्ये जनजागृतीला मोठी चालना मिळाली आहे.

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन सर्व प्रश्नांची अचूक माहिती भरली आणि यशस्वी नोंदणीनंतर ‘सेल्फ एन्युमरेशन आयडी (SE ID)’ प्राप्त केला. “जनगणना ही देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. नागरिकांकडून मिळणारी विश्वासार्ह माहितीच शासनाच्या भावी नियोजनासाठी उपयुक्त ठरते,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

  • १ मे ते १५ मे २०२७: या कालावधीत नागरिकांसाठी ऑनलाईन स्व-जनगणना सुविधा उपलब्ध आहे. नागरिक घरबसल्या मोबाईल किंवा संगणकाद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

  • १६ मे ते १४ जून २०२७: या काळात प्रगणक (Enumerators) घरोघरी भेट देऊन पुढील टप्प्यातील माहिती संकलित करतील.

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पिंपरी चिंचवडकर नागरिकांना आवाहन केले आहे की, शाळा, रस्ते, रुग्णालये, पाणी, वीज आणि रोजगार यांसारख्या मूलभूत सुविधांचे नियोजन जनगणनेच्या माहितीवरच अवलंबून असते. ज्या नागरिकांनी ऑनलाईन स्व-जनगणना पूर्ण केली आहे, त्यांनी प्रगणक घरी आल्यावर फक्त आपला ‘SEID’ क्रमांक दाखवावा, जेणेकरून प्रक्रिया अधिक सुलभ होईल.

नागरिकांनी दिलेली सर्व माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय राखली जाणार असून, ती केवळ राष्ट्रनिर्माणासाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपमहापौरांनी केले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!