news
‘महाराष्ट्रात नागपूरनंतर पिंपरी-चिंचवड ठरले सर्वाधिक प्रदूषित शहर’; CPCB च्या ‘समीर’ ॲपवरील नोंदीने खळबळ!‘सहकारी संस्थांवरील सत्तेचा मनमानी वापर खपवून घेणार नाही’; नरेंद्र बनसोडे व मानव कांबळे आक्रमक!‘बाल्कनीतून पसरलेल्या आगीत संपूर्ण फ्लॅट खाक, नागरिकांना सुखरूप बाहेर काढले’; रहाटणी व मुख्य अग्निशमन केंद्राची कौतुकास्पद कामगिरी!‘घरात निर्माण करा विश्वासाचे आणि मोकळ्या संवादाचे वातावरण’; अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी विशेष मार्गदर्शन!‘मंत्री गिरीश महाजन यांच्या बेजबाबदार विधानाने शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले मीठ’; वंचितांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल!
Home पिंपरी चिंचवड ‘मंत्री गिरीश महाजन यांच्या बेजबाबदार विधानाने शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले मीठ’; वंचितांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल!

‘मंत्री गिरीश महाजन यांच्या बेजबाबदार विधानाने शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले मीठ’; वंचितांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल!

बाळासाहेब आंबेडकरांच्या आवाहनानंतर राज्यभरात 'खर्डा भाकर' आंदोलनाचा भडका; पिंपरी-चिंचवडमधील जनचळवळींचा आंदोलनाला पूर्ण पाठिंबा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

वंचितांच्या व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आयोजित “खर्डा भाकरी” आंदोलनाला मारुती भापकर यांचा जाहीर पाठिंबा!

पिंपरी-चिंचवड / पुणे प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ९ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे: गेल्या वर्षीचा ओला दुष्काळ आणि यावर्षी ‘सुपर अल-निर्नो’मुळे पावसाने मारलेली दडी, यामुळे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांत शेतकऱ्यांचे भरून न निघणारे प्रचंड नुकसान झाले आहे. असे असताना राज्य सरकारने दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हाती केवळ पाच हजार रुपयांची तुटपुंजी मदत टेकवून बळीराजाची चेष्टा केली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी “खर्डा भाकरी” आंदोलनाला पिंपरी-चिंचवड शहरातील जनचळवळी व शेतकरी संघटनांच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.
नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नियोजनात व्यस्त असणारे मंत्री गिरीश महाजन यांनी “सरकारने दिलेली ५ हजार रुपयांची मदत पटत नसेल तर ती रक्कम परत करावी” असे बेजबाबदार विधान करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. कर्जमाफीचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही, सक्तीने कर्ज वसुली करून शेतकऱ्यांची घरे सील केली जात आहेत आणि आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. असे असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री निरलज्जपणे शेतकऱ्यांसोबत दिवाळीचा फराळ करून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर “खर्डा भाकर” आंदोलन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर चूल मांडून ती पेटवली आणि तिथेच भाकरी व खर्डा बनवून शेतकऱ्यांसोबत अन्न ग्रहण करत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.

या आंदोलनाला प्रत्यक्ष उपस्थित राहून जाहीर पाठिंबा देताना सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले की, “वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन बेमुदत आंदोलन करावे; ‘तुम्हीच पाणी द्या आणि तुम्हीच जेवण द्या’ असा आग्रह धरावा, असे आवाहन अकोल्यातील जाहीर सभेत केले होते. त्यांच्या या भूमिकेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.”
शासनाच्या या अत्यंत असंवेदनशील आणि बेजबाबदार कारभाराचा जाहीर निषेध करत मारुती भापकर यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व जनचळवळी आणि शेतकरी संघटनांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या या बळीराजा हिताच्या विधायक आंदोलनाला सक्रिय व संपूर्ण पाठिंबा जाहीर केला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!