news
‘महाराष्ट्रात नागपूरनंतर पिंपरी-चिंचवड ठरले सर्वाधिक प्रदूषित शहर’; CPCB च्या ‘समीर’ ॲपवरील नोंदीने खळबळ!‘सहकारी संस्थांवरील सत्तेचा मनमानी वापर खपवून घेणार नाही’; नरेंद्र बनसोडे व मानव कांबळे आक्रमक!‘बाल्कनीतून पसरलेल्या आगीत संपूर्ण फ्लॅट खाक, नागरिकांना सुखरूप बाहेर काढले’; रहाटणी व मुख्य अग्निशमन केंद्राची कौतुकास्पद कामगिरी!‘घरात निर्माण करा विश्वासाचे आणि मोकळ्या संवादाचे वातावरण’; अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी विशेष मार्गदर्शन!‘मंत्री गिरीश महाजन यांच्या बेजबाबदार विधानाने शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले मीठ’; वंचितांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल!
Home पिंपरी चिंचवड ‘महाराष्ट्रात नागपूरनंतर पिंपरी-चिंचवड ठरले सर्वाधिक प्रदूषित शहर’; CPCB च्या ‘समीर’ ॲपवरील नोंदीने खळबळ!

‘महाराष्ट्रात नागपूरनंतर पिंपरी-चिंचवड ठरले सर्वाधिक प्रदूषित शहर’; CPCB च्या ‘समीर’ ॲपवरील नोंदीने खळबळ!

कोरड्या हवामानामुळे हवेत तरंगताहेत विषारी धुलिकण; गतवर्षीच्या तुलनेत प्रदूषणात मोठी वाढ | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रदूषणाचा पुन्हा उद्रेक! रविवारी राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक प्रदूषित शहराची नोंद; भोसरीत सर्वाधिक २३६ AQI

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ९ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत हवेच्या प्रदूषणाने पुन्हा एकदा गंभीर रूप धारण केले आहे. रविवारी (८ नोव्हेंबर) रात्री ९ वाजता नोंदवलेल्या आकडेवारीनुसार पिंपरी-चिंचवडचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) थेट १९७ वर पोहोचला असून, महाराष्ट्रात नागपूर (२१७ AQI) पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक प्रदूषित शहराची नोंद झाली आहे. याच कालावधीत शेजारच्या पुणे शहराचा AQI १६१ नोंदवला गेला.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) ‘समीर’ (SAMEER) मोबाईल ॲपवरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील हवा दुपारपासूनच दूषित श्रेणीत होती. दुपारी ४ वाजता शहराचा AQI २०२ होता, तर रात्री ९ वाजेपर्यंत तो १९७ वर स्थिर राहिला.

पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत विविध भागांत प्रदूषणाची पातळी चिंताजनक स्तरावर पोहोचली आहे. भोसरी  २३६ (शहरातील सर्वाधिक प्रदूषित भाग), सावता माळी नगर  २२५, गवळीनगर  २२१, थेरगाव  २१५, भूमकर नगर  १८९, ट्रांसपोर्ट नगर  १६४, वाकड  १२९ पुणे शहरातील महसूल कॉलनी (शिवाजीनगर) येथे सर्वाधिक २०४ AQI ची नोंद झाली, तर हडपसर येथे २०० AQI नोंदवला गेला.

महाराष्ट्रतील इतर प्रमुख शहरांची स्थितीरी काही वेगळी नाहीए (रात्री ९ ची नोंद )-नागपूर  २१७ (राज्यात प्रथम), पिंपरी-चिंचवड  १९७ (राज्यात द्वितीय) , नाशिक  १७७, पुणे  १६१, नवी मुंबई  १५०, मुंबई: १३०

 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोरडे हवामान असल्याने पावसाची अनुपस्थिती आहे. पाऊस न पडल्यामुळे हवेतील सूक्ष्म धुलिकण आणि प्रदूषक घटक नैसर्गिकरीत्या वाहून न जाता वातावरणातच तरंगत राहत आहेत.
मागील वर्षीच्या (२०२५) दिवाळी कालावधीच्या तुलनेत यंदा हवेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी २१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता पुण्याचा AQI १३२ (मध्यम श्रेणी) होता, तर यंदाच्या नोंदीनुसार यात तब्बल २९ अंकांची वाढ झाली आहे.
हवेची गुणवत्ता घसरत असल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी विशेष खबरदारी घ्यावी, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!