news
‘महाराष्ट्रात नागपूरनंतर पिंपरी-चिंचवड ठरले सर्वाधिक प्रदूषित शहर’; CPCB च्या ‘समीर’ ॲपवरील नोंदीने खळबळ!‘सहकारी संस्थांवरील सत्तेचा मनमानी वापर खपवून घेणार नाही’; नरेंद्र बनसोडे व मानव कांबळे आक्रमक!‘बाल्कनीतून पसरलेल्या आगीत संपूर्ण फ्लॅट खाक, नागरिकांना सुखरूप बाहेर काढले’; रहाटणी व मुख्य अग्निशमन केंद्राची कौतुकास्पद कामगिरी!‘घरात निर्माण करा विश्वासाचे आणि मोकळ्या संवादाचे वातावरण’; अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी विशेष मार्गदर्शन!‘मंत्री गिरीश महाजन यांच्या बेजबाबदार विधानाने शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले मीठ’; वंचितांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल!
Home पिंपरी चिंचवड ‘सहकारी संस्थांवरील सत्तेचा मनमानी वापर खपवून घेणार नाही’; नरेंद्र बनसोडे व मानव कांबळे आक्रमक!

‘सहकारी संस्थांवरील सत्तेचा मनमानी वापर खपवून घेणार नाही’; नरेंद्र बनसोडे व मानव कांबळे आक्रमक!

पिंपरीतील आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग; मारुती भापकर व सहकाऱ्यांची उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरीत ‘इंडिया’ आघाडीकडून नवीन सहकारी शासन निर्णयाची होळी; गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेतील सरकारी हस्तक्षेपाविरोधात तीव्र आंदोलन!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ९ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सहकार कायद्यात अचानक बदल करून चार अतिरिक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी (दि. ९) तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी महायुती सरकारच्या सहकार क्षेत्रातील हस्तक्षेपाचा निषेध नोंदवत नवीन सहकारी शासन निर्णयाची होळी करण्यात आली.
या आंदोलनात काँग्रेस, आम आदमी पार्टी, स्वराज इंडिया, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष), छावा मराठा युवा महासंघ, संभाजी ब्रिगेड, ओबीसी महासंघ, डी. वाय. एफ. आय., सी. पी. आय. (एम), लोकशाही युवा संघटना आणि सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज संघ यासह विविध घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकार क्षेत्रातील प्रतिनिधी व लोकशाहीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलकांचे नेतृत्व करताना काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले की, “सहकारी संस्था या शेतकरी, दूध उत्पादक आणि सभासदांच्या सहभागातून उभ्या राहिलेल्या स्वायत्त लोकशाही संस्था आहेत. या संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सत्ताधाऱ्यांनी मनमानी हस्तक्षेप करणे आणि कायद्यात अचानक बदल करून मतदानाच्या अधिकारांवर गदा आणणे, हे सहकार क्षेत्राचे अस्तित्व संपवणारे आहे.”

“सहकार क्षेत्र हे शेतकरी व सभासदांच्या विश्वासावर उभे आहे. सत्तेच्या जोरावर सहकारी संस्थांच्या लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. सहकाराची स्वायत्तता टिकवण्यासाठी इंडिया आघाडी रस्त्यावर उतरून संघर्ष करेल.” – मानव कांबळे (पुरोगामी चळवळीचे नेते)

 

“सहकार वाचवण्यासाठी, लोकशाही टिकवण्यासाठी आणि सभासदांच्या मूलभूत अधिकारांच्या रक्षणासाठी हा लढा येणाऱ्या काळात अधिक व्यापक केला जाईल.” – मारुती भापकर (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते)

या आंदोलनात काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पुरोगामी चळवळीचे नेते मानव कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अशोक मोरे, आम आदमी पार्टीचे अध्यक्ष वैजनाथ शिरसाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, प्रवीण कदम, ओबीसी संघर्ष समितीचे प्रताप गुरव, आनंदा कुदळे, सचिन देसाई, DYFI चे देविदास जाधव, बी. बी. शिंदे, कविता कोंडे, अश्विनी पाटील, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्धीन शेख, बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष सोमनाथ शेळके, पुरुषोत्तम राऊत, हिराचंद जाधव, कबीर मोहम्मद, विल्यम साळवी, रवींद्र भोसकर, संदीप शिंदे, महेश शेख, रामकिसन माने, लक्ष्मण म्हेत्रे आणि जितेंद्र छाबडा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!