news
‘महाराष्ट्रात नागपूरनंतर पिंपरी-चिंचवड ठरले सर्वाधिक प्रदूषित शहर’; CPCB च्या ‘समीर’ ॲपवरील नोंदीने खळबळ!‘सहकारी संस्थांवरील सत्तेचा मनमानी वापर खपवून घेणार नाही’; नरेंद्र बनसोडे व मानव कांबळे आक्रमक!‘बाल्कनीतून पसरलेल्या आगीत संपूर्ण फ्लॅट खाक, नागरिकांना सुखरूप बाहेर काढले’; रहाटणी व मुख्य अग्निशमन केंद्राची कौतुकास्पद कामगिरी!‘घरात निर्माण करा विश्वासाचे आणि मोकळ्या संवादाचे वातावरण’; अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी विशेष मार्गदर्शन!‘मंत्री गिरीश महाजन यांच्या बेजबाबदार विधानाने शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले मीठ’; वंचितांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल!
Home पिंपरी चिंचवड ‘घरात निर्माण करा विश्वासाचे आणि मोकळ्या संवादाचे वातावरण’; अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी विशेष मार्गदर्शन!

‘घरात निर्माण करा विश्वासाचे आणि मोकळ्या संवादाचे वातावरण’; अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी विशेष मार्गदर्शन!

संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी व प्रा. डॉ. राजेश्वरी कन्नन यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन; युएचव्ही सेलचा स्तुत्य उपक्रम | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पीसीसीओई मध्ये “पालक व विद्यार्थी संबंध दृढता सभा” उत्साहात संपन्न!

पिंपरी-चिंचवड / पुणे प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ९ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात (PCCoE) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (AICTE) सार्वत्रिक मानवी मूल्य नोडल केंद्र (UHV) सेलच्या सहकार्याने “पालक व विद्यार्थी संबंध दृढता सभा” अत्यंत भावूक आणि प्रेरणादायी वातावरणात आयोजित करण्यात आली होती.
या प्रसंगी पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. राजेश्वरी कन्नन, पायाभूत विज्ञान विभाग प्रमुख डॉ. लीना शर्मा, डॉ. संदीप पाटील, समन्वयक मंजुषा देवकुळे आणि युएचव्ही सेलचे मार्गदर्शक डॉ. महेश कोलते आदी उपस्थित होते. या सभेसाठी पुणे, मुंबई, नागपूर, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, भुसावळ, जळगाव आणि शिर्डी यांसारख्या महाराष्ट्रातील विविध शहरांमधून ८३ पालकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. या वेळी आयोजित ‘पालक व विद्यार्थी चिंतनशील पत्रलेखन’ उपक्रमात पालकांनी आपल्या पाल्यांबाबतचा स्नेह, आशा, अपेक्षा आणि कौतुक पत्रांच्या माध्यमातून व्यक्त केले.

मार्गदर्शन करताना डॉ. राजेश्वरी कन्नन म्हणाल्या की, “उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करून अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर पालक आणि विद्यार्थी यांच्यातील नात्यात मोठे बदल होतात. मुलांचे वाढते वय, त्यांना हवी असलेली स्वायत्तता व स्वातंत्र्य आणि त्यांचा विकसित होणारा दृष्टिकोन लक्षात घेऊन पालकांनी त्यांना भावनिक सुरक्षा, विश्वास आणि योग्य मार्गदर्शन देणे अत्यंत गरजेचे आहे.”

 डॉ. लीना शर्मा यांनी सांगितले की, पालकांनी पाल्यांसोबत नेहमी प्रेमळ संवाद साधावा. घरात असे मोकळे वातावरण तयार करावे, जेणेकरून मुले आपल्या चिंता व्यक्त करताना, चुका मान्य करताना किंवा कठीण प्रसंगात निर्णय घेताना पालकांशी बिनधास्त हितगुज साधू शकतील.

 

डॉ. संदीप पाटील यांनी शैक्षणिक व दैनंदिन जीवनातील वास्तववादी प्रसंग सांगून विद्यार्थ्यांशी संवादात्मक चर्चा केली.

 

समन्वयक मंजुषा देवकुळे यांनी नात्यांमध्ये विश्वास, आदर, स्नेह, काळजी आणि योग्य मार्गदर्शन ही मूल्ये किती आवश्यक आहेत, यावर सविस्तर प्रकाश टाकला.

 

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या महत्त्वपूर्ण सभेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!