news
Home पिंपरी चिंचवड ‘सर्व राजकीय पक्ष व बहुक्षेत्रीय मान्यवर आले एकाच मंचावर’; दिशा सोशल फाउंडेशनच्या उपक्रमाचे शहरात कौतुक!

‘सर्व राजकीय पक्ष व बहुक्षेत्रीय मान्यवर आले एकाच मंचावर’; दिशा सोशल फाउंडेशनच्या उपक्रमाचे शहरात कौतुक!

महापौर रवी लांडगे, खासदार श्रीरंग बारणे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती; अध्यक्ष बाळासाहेब जवळकर यांच्याकडून सर्व उपस्थितांचे स्वागत | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

दिशा सोशल फाउंडेशनच्या दशकपूर्ती दिवाळी फराळाला दिग्गजांची मांदियाळी!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ७ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: सततचे हेवेदावे, आरोप-प्रत्यारोप, वर्चस्ववाद आणि कुरघोडीचे राजकारण… सगळे काही बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्षांचे दिग्गज नेते, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी शनिवारी (७ नोव्हेंबर) एकत्रितपणे दिवाळी फराळाचा मनमुराद आनंद घेतला.
दिशा सोशल फाउंडेशनच्या ‘दिवाळी फराळ’ उपक्रमाची यंदा दशकपूर्ती होती. या निमित्ताने काळेवाडी येथील ‘रागा पॅलेस’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्यात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात साडेतीन तास गप्पांची रंगतदार मैफल रंगली. सर्वपक्षीय व बहुक्षेत्रीय मान्यवरांच्या एकत्र येण्याने दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला.

या सोहळ्यास पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, बापूसाहेब पठारे, शंकर मांडेकर, अमित गोरखे, माजी आमदार विलास लांडे, गौतम चाबुकस्वार, पुण्याचे निवृत्त विभागीय आयुक्त दिलीप बंड, पिंपरी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर प्रामुख्याने उपस्थित होते.
याशिवाय, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, शिवसेनेचे शहराध्यक्ष चेतन पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, आर.पी.आय. शहराध्यक्ष नगरसेवक कुणाल वाव्हळकर, काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी शहराध्यक्ष वसंत लोंढे, अजित गव्हाणे, सचिन साठे, सदाशिव खाडे, नगरसेवक राहुल कलाटे, नाना काटे, विनोद नढे, अमित गावडे, सुरेश भोईर, तुषार हिंगे, माजी नगरसेवक धनंजय काळभोर, सुजीत पाटील, यशवंत भोसले, शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती शिंदे, विष्णुपंत नेवाळे, माणिकराव अहिरराव, महेश कुलकर्णी, राजेंद्र बाबर, अमित बाबर, निलेश शिंदे, अनिल लोंढे, हेमंत फुगे, उमेश लोंढे, रमेश काशीद, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर उपस्थित होते.
तसेच सहकार, बँकिंग, उद्योग व सांस्कृतिक क्षेत्रातील इंद्रायणी बँकेचे संस्थापक ॲड. एस. बी. चांडक, प्रेरणा बँकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर, उद्योजक कृष्णकुमार गोयल, वसंत काटे, विजय जगताप, उमेश चांदगुडे, मनोज जरे, अशोक पुजारी, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे, पिंपरी पालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप, उपायुक्त अण्णा बोदडे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, गणेश कवठेकर, नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष राहुल भंडारे, लेखक-दिग्दर्शक संतोष पवार, राजेश शिंदे, नितीन धुंदुके, ‘कलोपासक’चे प्रदीप पाटसकर, ‘लीड मीडिया’चे प्रमुख विनोद सातव, ‘किमया कम्युनिकेशन्स’चे जयंत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

दशकपूर्ती उपक्रमाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा विशेष ‘दिशा सन्मान’ देऊन गौरव करण्यात आला.
महेश सूर्यवंशी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निवृत्त विभागीय आयुक्त दिलीप बंड, आमदार महेश लांडगे व शंकर जगताप यांच्या हस्ते सत्कार.
आर्या विजय कांबळे चिंचवड येथील आगीच्या प्रसंगी अतुलनीय धाडस दाखवून अनेकांचे प्राण वाचवल्याबद्दल महापौर रवी लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते विशेष सत्कार.
‘अलबत्या-गलबत्या’ बालनाट्य टीम पुण्यात सलग सात प्रयोग करून विश्वविक्रम नोंदवणाऱ्या व १,००० प्रयोगांचा टप्पा गाठणाऱ्या टीमचा सत्कार. निर्माते राहुल भंडारे, अभिनेत्री श्रद्धा हांडे, सनी मुणगेकर, निलेश गोपनारायण यांनी सत्काराचा स्वीकार केला.
‘द फोक आख्यान’ टीम जगभरात लोकप्रिय ठरलेल्या या टीमचा शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते सत्कार. त अर्णव कोतकर, शुभम साळवी, विश्वजीत लोंढे, अभिजी लोंढे यांनी सत्कार स्वीकारला.
हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांचा आमदार शंकर मांडेकर, अमित गोरखे व डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते सत्कार.
प्रसिद्ध नाटककार, लेखक व दिग्दर्शक संतोष पवार यांचा ‘चंद्ररंग’चे संचालक विजय जगताप यांच्या हस्ते सत्कार.
 ‘PC7’ न्यूज चॅनेलचे प्रमुख व ज्येष्ठ पत्रकार संदेश पुजारी यांचा वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नगरसेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते सत्कार.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर यांनी सर्व उपस्थितांचे सहर्ष स्वागत केले. या कार्यक्रमाचे नेटके नियोजन राजेंद्र करपे, संतोष बाबर, नंदकुमार कांबळे, संतोष निंबाळकर, गोरख भालेकर, नाना शिवले, सचिन साठे आदींसह दिशा सोशल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार बाजीराव लोखंडे यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!