8

पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात (PCCoE) ‘टेकफेस्ट २०२६’ तांत्रिक महोत्सवात नवोपक्रमांचे दिमाखदार प्रदर्शन!
पिंपरी-चिंचवड / पुणे प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ७ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात (PCCoE) विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण आणि तांत्रिक कौशल्ये जगासमोर आणण्यासाठी ‘टेकफेस्ट २०२६’ या भव्य अभियांत्रिकी तांत्रिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशिनिंग आणि विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे अनोखे प्रदर्शन पाहायला मिळाले. या संपूर्ण महोत्सवाचे समन्वय असोसिएट डीन अमित पांचवडकर आणि डॉ. पी. ए. देशमुख यांनी सांभाळले.
संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

या महोत्सवात अभियांत्रिकीच्या विविध शाखांनी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
मेसा (MESA) विभाग- ‘गॅलॅक्सिया २०२६’ अंतर्गत मशिनिंग, रोबोटिक्स, मोटर स्पोर्ट सिम्युलेशन्स आणि फॉर्म्युला वन वर आधारित ‘फॉर्म्युला हार्डवेअर’, ‘एरो एक्स’, ‘पिट स्टॉप प्रोटोकॉल’ या संकल्पना राबवण्यात आल्या.
स्थापत्य अभियांत्रिकी विभाग- ‘स्ट्रक्चरल शोडाऊन’ (पूल मॉडेल स्पर्धा), ‘इकोव्हिजन’ (शाश्वतता पोस्टर स्पर्धा), ‘कॅडनोव्हा’ (ऑटोकॅड डिझाईन), ‘३-डी शोडाऊन’ आणि ‘द साईट इन्व्हेस्टिगेशन’ या खजिना शोध मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार विभाग- ‘नेक्सस २०२६-२७: ड्रिव्हन बाय आयडियाज’ अंतर्गत नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण झाले.
संगणक विज्ञान व एआय विभाग- ‘अनंत्या २०२६’ अंतर्गत कोडिंग, सायबर सुरक्षा, हॅकेथॉन आणि आयओटीचे प्रदर्शन भरले. यात ‘शी सॉल्व्हज ३.०’ मध्ये तब्बल १०९ संघांनी नोंदणी केली होती.
CSE (AI & ML) विभाग- ‘आर्टिमास २०२६-२७’ अंतर्गत हॅकमॅट्रिक्स ५.० डेटाथॉन, सायबर सुरक्षा आव्हाने, ‘प्रॉम्प्टिफाय’ (AI चॅलेंज), ‘द किलर्स ट्रेल’ (मिस्ट्री सॉल्व्हिंग) आणि ‘लॉजिक लॅम्प ३.०’ या सांघिक स्पर्धा पार पडल्या.

महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकी संस्थांमधून १५०० पेक्षा अधिक तरुण स्पर्धकांनी या महोत्सवात सहभाग घेतला. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक ज्ञान आणि रोबोटिक्सची माहिती मिळाली नाही, तर सांघिक कार्य (Teamwork), सर्जनशीलता आणि समस्या निवारण (Problem Solving) कौशल्यांना मोठे प्रोत्साहन मिळाले. भविष्यातील उत्तम अभियंते घडवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अत्यंत अनन्यसाधारण असल्याचे प्राध्यापकांनी यावेळी नमूद केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
