news
‘नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बजाज प्रशासनाला धडा शिकवणार’; हवा प्रदूषण कायद्याच्या उल्लंघनावर मनसेचा एल्गार!‘टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवत विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश’; दारापूर येथे दिमाखदार सांस्कृतिक उपक्रम!‘फाटकाचा खोळंबा संपला, मेट्रो स्टेशनला मिळणार जलद कनेक्टिव्हिटी’; पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाचे लोकार्पण संपन्न!‘एनसीएमसी कार्ड अन् सायकल सुविधेला नागरिकांची पसंती’; गर्दीच्या वेळेत दर ५ मिनिटांनी सुटणार मेट्रो!‘गणेश तलावाचे नैसर्गिक सौंदर्य व जैवविविधता टिकवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार’; उपमहापौर शर्मिला बाबर!
Home पिंपरी चिंचवड ‘नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बजाज प्रशासनाला धडा शिकवणार’; हवा प्रदूषण कायद्याच्या उल्लंघनावर मनसेचा एल्गार!

‘नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बजाज प्रशासनाला धडा शिकवणार’; हवा प्रदूषण कायद्याच्या उल्लंघनावर मनसेचा एल्गार!

सेक्टर २२ व ओटा स्कीम परिसरातील हजारो रहिवासी त्रस्त; मनसे अध्यक्ष राज साहेबांनाही पाठवले निवेदनाचे पत्र | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

यमुनानगर येथील बजाज ऑटो पेंट शॉपमधील केमिकल दुर्गंधी व वायू प्रदूषणावर तातडीने कारवाई करा; मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ६ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

चिंचवड: निगडी, यमुनानगर येथील बजाज ऑटो लि. (Bajaj Auto Ltd.) च्या पेंटिंग शॉपमधून गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात केमिकल युक्त तीव्र दुर्गंधी आणि विषारी धुराचे उत्सर्जन होत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, याप्रकरणी प्रशासनाने व कंपनी व्यवस्थापनाने तातडीने कारवाई करावी; अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला आहे.
या संदर्भात मनसेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) प्रादेशिक अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (निगडी पोलीस ठाणे) आणि बजाज ऑटोचे प्लांट हेड यांना अधिकृत निवेदन देण्यात आले आहे. तसेच हे निवेदन माहितीसाठी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनाही पाठवण्यात आले आहे.

मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी निवेदनात नमूद केले आहे की, “बजाज ऑटोच्या पेंट शॉपमधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे यमुनानगर, सेक्टर २२ आणि ओटा स्कीम परिसरातील हजारो नागरिक, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना श्वसनाचा त्रास होणे, डोळ्यांची जळजळ होणे, घसा खवखवणे, सतत डोकेदुखी आणि मळमळ होणे अशा गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा प्रकार ‘हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९८१’ च्या कलम २१ व २२ चा उघडपणे होणारा भंग आहे.”

याबाबत कंपनीच्या पर्यावरण विभाग व वरिष्ठ व्यवस्थापनाकडे वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रारी करून, तसेच प्रत्यक्ष बैठका घेऊनही कंपनीने कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केलेली नाही. हे कंपनीचे नागरिकांच्या आरोग्याबाबतचे अत्यंत बेजबाबदार वर्तन आहे.
त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) या परिसरात तातडीने हवेचे नमुने (Air Quality Monitoring) घेऊन पाहणी करावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“येत्या ७ दिवसांत या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास, परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी मनसे स्टाईलने बजाज ऑटोच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. यातून उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीला बजाज प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील.”
— सचिन चिखले (शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पिंपरी-चिंचवड)

प्रदूषणामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी आपली आपबीती मांडण्यासाठी माध्यमांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले असून, यासाठी प्रदीप पाटील (९८२२६०४७५१) आणि सायली कराड (९३७३७१२१०३) यांच्याशी संपर्क साधता येईल.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!