news
Home पिंपरी चिंचवड ‘सांगवीत माधवबागकडून ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीची कौटुंबिक भेट’; आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जपली सामाजिक बांधीलकी!

‘सांगवीत माधवबागकडून ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीची कौटुंबिक भेट’; आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जपली सामाजिक बांधीलकी!

ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ व पदाधिकाऱ्यांकडून माधवबाग टीमचे आभार; सांगवीत उत्साही वातावरण | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

माधवबाग आयुर्वेदतर्फे सांगवीतील ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यदायी दिवाळी भेट!

पिंपरी-चिंचवड / सांगवी प्रतिनिधी सुनील पोकरे, दि. ७ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

सांगवी: दिवाळीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून माधवबाग आयुर्वेदतर्फे सांगवी येथील ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना आरोग्यदायी दिवाळी भेट देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. माधवबागचे संचालक तुषार पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी महासंघाच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन सर्व पदाधिकाऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच, ज्येष्ठ नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आगामी काळात विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
वयाची साठी ओलांडल्यानंतर आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. याच सामाजिक भावनेतून आणि उत्तरदायित्वातून माधवबागने हा स्तुत्य उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

या प्रसंगी बोलताना माधवबागचे संचालक तुषार पाटील म्हणाले की, “ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समृद्ध समाजाचा खरा पाया आहेत. त्यांचा आनंद, चेहऱ्यावरील हास्य आणि उत्तम आरोग्य हीच आमची खरी दिवाळी आहे. त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावे, या प्रामाणिक सदिच्छेतून आम्ही या उपक्रमाचे आयोजन केले आहे.”

या सोहळ्यास ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ, सरचिटणीस ईश्वरलाल चौधरी, सहसरचिटणीस एकनाथ घुले, कोषाध्यक्ष हेमचंद्र जावळे, स्वीकृत सदस्य व प्रवक्ते अरुण बागडे यांच्यासह महासंघाचे इतर सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माधवबागच्या या कौतुकास्पद, संवेदनशील आणि उपक्रमाबद्दल महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी तुषार पाटील व त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानले. हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि कौटुंबिक-भावनिक वातावरणात संपन्न झाला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!