news
Home पिंपरी चिंचवड ‘शासनाने विद्यार्थी दिनाचे औचित्य गांभीर्याने घ्यावे’; रयत विद्यार्थी विचार मंचाचा पिंपरीत महामानवाला मानाचा मुजरा!

‘शासनाने विद्यार्थी दिनाचे औचित्य गांभीर्याने घ्यावे’; रयत विद्यार्थी विचार मंचाचा पिंपरीत महामानवाला मानाचा मुजरा!

प्रा. विक्रांत शेळके व संतोष शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संकल्प सोहळा; संविधानिक मूल्यांच्या प्रसारावर भर | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

रयत विद्यार्थी विचार मंचाच्या वतीने विद्यार्थी दिन उत्साहात साजरा; भीमसृष्टी स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ७ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक शाळा प्रवेश दिनानिमित्त, म्हणजेच ‘विद्यार्थी दिना’च्या औचित्याने रयत विद्यार्थी विचार मंचाच्या वतीने पिंपरी येथील भीमसृष्टी स्मारकात विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. शिक्षण, समता, स्वाभिमान आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार करण्याचा संकल्प सर्व उपस्थितांनी यावेळी केला.
या कार्यक्रमास रयत विद्यार्थी विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे, प्रभारी अध्यक्ष प्रा. विक्रांत शेळके, प्रदेश महासचिव संतोष शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मयूर जगताप आणि प्रदेश संपर्कप्रमुख अतुल वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंचाचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी शासनाच्या उदासीन भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “महाराष्ट्र शासनाने २०१७ सालापासून ७ नोव्हेंबर हा दिवस ‘विद्यार्थी दिन’ म्हणून अधिकृतपणे घोषित केला असला, तरीही शासनाच्या वतीने या दिवसाचे औचित्य आणि महत्त्व गांभीर्याने घेतले जात नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा केवळ राजकीय वापर केला जातो; मात्र त्यांच्या मूलगामी शैक्षणिक विचारांचा प्रसार आणि विद्यार्थी दिनाचा व्यापक शासकीय स्तरावर सन्मान होताना दिसत नाही.”
पुढे बोलताना त्यांनी मागणी केली की, “विद्यार्थी दिन हा केवळ शासकीय शासन निर्णयापुरता (GR) मर्यादित न राहता, राज्यातील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला पाहिजे.”
रयत विद्यार्थी विचार मंचाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत प्रसार करण्याचा दृढ संकल्प केला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!