news
Home पिंपरी चिंचवड ‘फॉर्म्युला भारत ते इंटरनॅशनल रोव्हर चॅलेंजपर्यंत पीसीसीओईचा डंका’; राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाची ऐतिहासिक कामगिरी!

‘फॉर्म्युला भारत ते इंटरनॅशनल रोव्हर चॅलेंजपर्यंत पीसीसीओईचा डंका’; राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाची ऐतिहासिक कामगिरी!

८६.७७ गुणांचा प्रभावी स्कोअर करत १०५ उपक्रम यशस्वी; अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे व सचिव विठ्ठल काळभोर यांच्याकडून कौतुक | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाला (PCCoE) आयआयसी संस्थेचा प्रतिष्ठित “फोर स्टार” मानांकनाचा पुरस्कार जाहीर!

पिंपरी-चिंचवड / पुणे प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ८ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाला (PCCoE) केंद्रीय शिक्षण मंत्रालय, एआयसीटीई (AICTE), नवोन्मेष कक्ष आणि संस्थेची नवोन्मेष परिषद (IIC) यांच्या वतीने अत्यंत प्रतिष्ठित असणारा “फोर स्टार रेटिंग” (Four Star Rating) पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळणे म्हणजे संपूर्ण पीसीईटी व्यवस्थापनाचा आणि महाविद्यालयाचा गौरव असल्याची भावना संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी व्यक्त केली.
पीसीसीओईने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये कॅम्पसमध्ये नवोन्मेष (Innovation) आणि स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने निर्धारित केलेले विविध उपक्रम अत्यंत यशस्वीपणे राबवले होते. याची दखल घेऊन आयआयसीने हे बहुमान प्रमाणपत्र बहाल केले आहे. एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम, शिक्षण मंत्रालयाच्या नवोन्मेष कक्षाचे मुख्य नवोन्मेष अधिकारी डॉ. अभय जेरे आणि सहायक नवोन्मेष संचालक दिपान साहू यांनी हे प्रमाणपत्र प्रदान करून पीसीसीओईच्या कामगिरीचा गौरव केला.

पुरस्काराविषयी बोलताना पीसीईटीचे सचिव विठ्ठल काळभोर म्हणाले की, “हा पुरस्कार म्हणजे आमच्या महाविद्यालयाच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांनी अलीकडच्या काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ऐतिहासिक यश मिळवले आहे.”
ॲस्ट्रोव्हर्स अक्षयन २०२६- राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत प्रथम क्रमांक. फॉर्म्युला भारत- आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील व्यवसाय योजना सादरीकरणात (Business Plan Presentation) तृतीय स्थान. नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज (ड्रोन ॲप्लिकेशन)- अखिल भारतीय स्तरावर द्वितीय क्रमांक. इंटरनॅशनल रोव्हर चॅलेंज २६- ‘इमर्जिंग टीम ऑफ the इयर’ किताब मिळवत जागतिक स्तरावर १२ वा क्रमांक पटकावला.

 

पीसीईटीचे खजिनदार शांताराम गराडे यांनी सांगितले की, “राष्ट्रीय स्तरावरील ‘ई-बाजा एसएई इंडिया’ (e-BAJA SAE India) स्पर्धेत पीसीसीओईने द्वितीय उपविजेतेपद पटकावले आहे. यामध्ये स्टॅटिक्स, डायनॅमिक्स, एंड्युरन्स, मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स आणि सेल्स अशा सर्वच विभागांत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे.”

पीसीसीओईचे संचालक तथा प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी माहिती दिली की, “संस्थेच्या नवोन्मेष परिषदेने (IIC) १०० पैकी तब्बल ८६.७७ गुणांचा प्रभावी कामगिरी स्कोअर मिळवला आहे. तसेच आमचे सर्व १०५ नवोन्मेष आणि उद्योजकता उपक्रम यशस्वीरीत्या मंजूर व पूर्ण झाले आहेत. हे यश नवोन्मेष आधारित शिक्षण, उद्योजक विचार, बौद्धिक संपदा हक्क जागरूकता आणि स्टार्टअप विकासाला दिलेल्या सातत्यपूर्ण प्रोत्साहनाचे फलित आहे.”
या संपूर्ण यशात पीसीसीओईच्या नवोन्मेष आणि उद्योजकता विभागाच्या अधिष्ठाता तथा आयआयसीच्या अध्यक्षा डॉ. रजनी पी. के., सहयोगी अधिष्ठाता तथा आयआयसीचे उपाध्यक्ष डॉ. मुबीन तांबोळी आणि सहयोगी अधिष्ठाता तथा संयोजक डॉ. अजय गाढे यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.
संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, नियामक मंडळाचे सदस्य नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी महाविद्यालयाच्या संपूर्ण ‘टीम पीसीसीओई’चे अभिनंदन केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!