news
Home पिंपरी चिंचवड विजयोत्सवावर दुःखाचे सावट! पिंपरी-चिंचवड भाजपकडून बंगाल विजयाचा जल्लोष रद्द

विजयोत्सवावर दुःखाचे सावट! पिंपरी-चिंचवड भाजपकडून बंगाल विजयाचा जल्लोष रद्द

नसरापूर येथील घटनेचा निषेध करत मोरवाडी कार्यालयात फक्त प्रतिमा पूजन; सामाजिक संवेदनशीलता जपत कार्यकर्त्यांनी मानले विजयाचे आभार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

विजयाचा आनंद मोठा, पण चिमुकलीचे दुःख त्याहून मोठे; पिंपरी-चिंचवड भाजपने नाकारला जल्लोष

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, ५ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या ऐतिहासिक यशाबद्दल संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण असतानाच, पिंपरी-चिंचवड शहर भाजपने आपली सामाजिक संवेदनशीलता जपली आहे. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका चिमुकलीवर झालेल्या दुर्दैवी अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून पक्षाने कोणताही सार्वजनिक जल्लोष, फटाकेबाजी किंवा गुलाल उधळण न करण्याचा निर्णय घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या मोठ्या विजयानिमित्त मोरवाडी येथील मुख्य कार्यालयात अत्यंत साधेपणाने कार्यक्रम पार पडला. यावेळी भारत माता व जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून विजयाचे स्वागत करण्यात आले. पश्चिम बंगालमधील विजय हा लोकशाहीचा आणि विकासाच्या राजकारणाचा विजय असल्याचे सांगतानाच, पुण्यातील त्या घटनेमुळे मन सुन्न झाले असून अशा परिस्थितीत जल्लोष करणे योग्य नसल्याची भावना नेत्यांनी व्यक्त केली.

शत्रुघ्न बापू काटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास पक्षाचे अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते:

  • माजी खासदार: अमर साबळे

  • आमदार: उमा खापरे

  • उपमहापौर: शर्मिला बाबर

  • संघटन सरचिटणीस: मोरेश्वर शेडगे, सदाशिव खाडे

  • सरचिटणीस: मधुकर बच्चे, वैशाली खाडये

याप्रसंगी राजेश पिल्ले, सुजाता पालांडे (महिला मोर्चा अध्यक्षा), राजू दुर्गे, सुरेश भोईर, मंदार देशपांडे, पल्लवी वाल्हेकर, संजय पटणी, विजय सिनकर, नेताजी शिंदे, नंदू कदम, देवदत्त लांडे, प्रकाश जवळकर, संजीविनी पांडे, पोपट हजारे, युवराज लांडे, निलेश अष्टेकर, शितल कुंभार, संतोष भालेराव, गोरख कुंभार, गणेश ढाकणे आणि अजित भालेराव यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकशाहीतील विजयाचा आदर करतानाच सामाजिक दुःखात सहभागी होऊन पिंपरी-चिंचवड भाजपने शहरवासीयांसमोर एक संवेदशील आदर्श ठेवला आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!