news
पिंपरीतील ‘श्रीटिकेल’ कंपनीच्या २७५ कामगारांनी केले रक्तदान; ‘वायसीएम’ मधील गरीब रुग्णांना मिळणार जीवनदान!पिंपरी-चिंचवडमधील १३४ मनपा शाळांमध्ये सुट्टीच्या दिवशी घुमला ‘ओंकार’ नाद! आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभागपिंपरी-चिंचवड मनपा आणि योग विद्या धामच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ संकल्पनेवर भव्य योग सोहळा!रहाटणीत आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह! आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज उद्यानात सामूहिक योगसाधनापिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्त
Home पिंपरी चिंचवड पिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्त

पिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्त

राष्ट्रवादी अर्बन सेलचे शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड यांच्या तक्रारीची २४ तासांत दखल; मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्ता प्रवाशांसाठी अखेर सुरक्षित | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा दणका! मनपा मुख्यालयाबाहेरील धोकादायक ड्रेनेज चेंबर २४ तासांत दुरुस्त; दोन्ही नवीन झाकणे बसवली

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, २१ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि नागरिकांच्या जिवाशी होणारा खेळ आम्ही कधीही खपवून घेणार नाही. पिंपरी-चिंचवड मनपा मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेला तो धोकादायक मृत्यूचा सापळा अखेर नष्ट करण्यात यश आले आहे. ‘मॅक्स मंथन डेली न्यूज’ने या गंभीर नागरी समस्येवर कडाडून प्रहार करताच सुस्तावलेले मनपा प्रशासन खडबडून जागे झाले. केवळ २४ तासांच्या आत घटनास्थळी नवीन दर्जेदार झाकणे बसवून हा रस्ता सुरक्षित करण्यात आला आहे,” अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) अर्बन सेलचे शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी दिली.

पिंपरी येथील महानगरपालिका मुख्य मुख्यालयाच्या प्रवेशद्वारापासून अवघ्या १० मीटर अंतरावर, अत्यंत वर्दळीच्या मुंबई-पुणे महामार्गावर ड्रेनेजचे चेंबर अत्यंत धोकादायक अवस्थेत तुटलेले होते. येथून २४ तास अतिशय वेगाने वाहने धावत असल्याने, विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा एक अत्यंत जीवघेणा खड्डा ठरत होता. महापालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि सर्व वरिष्ठ अधिकारी दररोज याच रस्त्यावरून आपल्या वातानुकूलित गाड्यांमधून जात असतानाही कोणालाही हा खड्डा दिसत नव्हता.

या गंभीर समस्येकडे बोट ठेवत प्रदीप गायकवाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता आणि ‘मॅक्स मंथन डेली न्यूज‘ने या संदर्भात “दिव्याखाली अंधार! पिंपरी-चिंचवड मनपा मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच ड्रेनेजचे चेंबर ठरतेय ‘डेथ ट्रॅप'” या मथळ्याखाली सडेतोड बातमी प्रसिद्ध केली होती.

 

ही बातमी प्रसिद्ध होताच मनपाच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. बातमीची गंभीर दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ सूत्रे हलवली. रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही मनपाच्या तांत्रिक पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि युध्दपातळीवर काम सुरू करून तुटलेली दोन्ही जुनी झाकणे काढून त्याठिकाणी अत्यंत मजबूत व दर्जेदार नवीन झाकणे बसवून रस्ता पूर्णपणे सुरक्षित केला. ‘काल तक्रार आणि आज काम ओके’ झाल्यामुळे वाहनचालकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

या जलद आणि यशस्वी कारवाईनंतर समाधान व्यक्त करताना आणि ‘मॅक्स मंथन’ समूहाचे कौतुक करताना प्रदीप गायकवाड म्हणाले:

“सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणे आणि प्रशासनाला जागे करणे हे एका खऱ्या वृत्तवाहिनीचे काम असते. ‘मॅक्स मंथन डेली न्यूज’ने नेहमीच शहरातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे धाडस दाखवले आहे. आम्ही ही समस्या मांडताच चॅनेलचे कार्यकारी संपादक आदरणीय भाई विशाल जाधव यांनी तात्काळ या वृत्तविशेषाला प्रसिद्धी देऊन प्रशासनाचे कान उपटले, म्हणूनच आज हा रस्ता सुरक्षित होऊ शकला आहे. मी भाई विशाल जाधव आणि त्यांच्या संपूर्ण पत्रकार चमूचे मनापासून आभार मानतो. जनतेचे प्रश्न सुटण्यासाठी आमचा हा संघर्ष यापुढेही ‘मॅक्स मंथन’च्या साथीने अविरत सुरूच राहील!”

 

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!