news
Home पिंपरी चिंचवड जनगणना २०२६-२७: पिंपरी-चिंचवडच्या ‘अ’ प्रभागात प्रशिक्षणाचा धडाका! ५२५ प्रगणक सज्ज

जनगणना २०२६-२७: पिंपरी-चिंचवडच्या ‘अ’ प्रभागात प्रशिक्षणाचा धडाका! ५२५ प्रगणक सज्ज

१ ते १५ मे दरम्यान 'स्व-गणना' पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आवाहन; ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

निगडी येथे ‘आपली जनगणना आपला विकास’ प्रशिक्षणाला सुरुवात

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, ५ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

निगडी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्रात आगामी जनगणना २०२६-२७ च्या मोहिमेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वी करण्यासाठी प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण शिबिरामध्ये कर्मचाऱ्यांना जनगणनेचे तांत्रिक आणि क्षेत्रीय कामाचे सखोल मार्गदर्शन दिले जात आहे.

  • कालावधी: हे प्रशिक्षण २५ एप्रिलपासून सुरू झाले असून ८ मे पर्यंत चालणार आहे.

  • प्रशिक्षणार्थी: ‘अ’ क्षेत्रीय प्रभागातील एकूण १२ बॅचेसमध्ये ५२५ प्रगणकांना प्रशिक्षित केले जात आहे.

  • वेळ आणि बॅच: दररोज सकाळी ९:३० ते ५:३० या वेळेत प्रत्येक बॅचमधील ५० प्रशिक्षणार्थींना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाते.

  • प्रशिक्षक: जनगणना कार्यालयाने नियुक्त केलेले अनुभवी स्किल फिल्ड ट्रेनर श्री. राजू कोंढवडे, श्री. केदार शंकर, श्री. प्रणव गुरव आणि तुषार बारगे हे प्रशिक्षण देत आहेत.

याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापौर रवि लांडगे आणि ‘अ’ क्षेत्रीय अधिकारी सौ. निवेदिता घारगे यांनी नागरिकांना राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

१ ते १५ मे दरम्यान नागरिकांनी स्वतःची स्व-गणनेची (Self Enumeration) माहिती ॲपवर नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच १६ मे नंतर जेव्हा प्रगणक घरी येतील, तेव्हा त्यांना अचूक माहिती देऊन या मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणाचे नियोजन यशस्वी करण्यासाठी प्रगणक श्री. बाळू महाजन, पवार गोरक्ष, बोंबले संदीप, पाटील राजेंद्र, भोसले बाबुराव, सौ. दिपाली मोहिते, डॉ. पवार माधुरी, वाघमारे नीता आणि सौ. नेमाडे तनुजा आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रास्ताविक श्री. बाळू महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाम पोटघन यांनी मानले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!