news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड पीसीएमसीच्या कारभारावर ६ हजार कोटींचे प्रश्नचिन्ह! मारुती भापकर यांचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

पीसीएमसीच्या कारभारावर ६ हजार कोटींचे प्रश्नचिन्ह! मारुती भापकर यांचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

१९८२ पासूनच्या लेखापरीक्षणातील धक्कादायक वास्तव समोर! प्रलंबित आक्षेप आणि वसुलीपात्र रकमांवरून सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर आक्रमक; आयुक्त आणि महापौरांना दिले सविस्तर निवेदन. ६ हजार २३४ कोटी रुपयांची रक्कम वादग्रस्त; प्रशासकीय दिरंगाईवर ओढले ताशेरे. | @२०२६ | मॅक्स मंथन विशेष

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिकेत ६ हजार २५७ कोटींचा गैरव्यवहार? ८ दिवसांत कारवाई करण्याची मारुती भापकर यांची मागणी

 

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दिनांक: २९ मार्च २०२६, © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या लेखापरीक्षणातून तब्बल ६ हजार २५७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार व गैरकारभाराचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे. या प्रकरणातील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर येत्या आठ दिवसांत कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी मारुती भापकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.

मारुती भापकर यांनी महापौर, आयुक्त, स्थायी समिती सभापती, सत्तारूढ पक्षनेते आणि विरोधी पक्षनेते यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंदर्भात सविस्तर निवेदन दिले आहे. महापालिकेच्या अंतर्गत व विशेष लेखापरीक्षणात प्रचंड आर्थिक अनियमितता आढळून आली असून, त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे.

मुख्य लेखापरीक्षकांनी दिलेल्या माहितीचा हवाला देत मारुती भापकर यांनी सांगितले की, सन १९८२-८३ ते मार्च २०२६ या प्रदीर्घ कालावधीत प्रलंबित आक्षेप, वसूलपात्र रक्कम आणि तपासणीअभावी आक्षेपाधीन राहिलेली रक्कम मिळून सुमारे ६ हजार २३४ कोटी रुपयांची रक्कम वादग्रस्त आहे. याव्यतिरिक्त, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या विशेष लेखापरीक्षणात आणखी २२ कोटी रुपयांचा मुद्दा समोर आला आहे. अशा प्रकारे एकूण ६ हजार २५७ कोटी १ लाख ५८ हजार ८५ रुपयांच्या रकमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, हा मोठा आर्थिक गैरव्यवहार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

लेखापरीक्षण विभागावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, मात्र आढळलेल्या अनियमिततेवर आणि वसुलीपात्र रकमांवर वेळेत कारवाई का होत नाही? असा सवाल मारुती भापकर यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने यावर दोन महिन्यांच्या आत ठोस पावले उचलली नाहीत, तर पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

या गंभीर आरोपामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोट्यवधी रुपयांच्या या कथित गैरव्यवहारावर आता पालिका प्रशासन आणि सत्ताधारी काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!