news
Home पिंपरी चिंचवड भगवान महावीरांच्या जयघोषाने पिंपळे गुरव दुमदुमले! जैन बांधवांच्या मिरवणुकीचे जंगी स्वागत

भगवान महावीरांच्या जयघोषाने पिंपळे गुरव दुमदुमले! जैन बांधवांच्या मिरवणुकीचे जंगी स्वागत

आनंदऋषीजी महाराज आणि नवकार महामंत्राची प्रतिमा देऊन अभिवादन; सामाजिक सलोख्याचे दर्शन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपळे गुरवमध्ये महावीर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक; राजीव गांधी प्रतिष्ठानकडून उत्साहात स्वागत

 

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दिनांक: १ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: ‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ या महान तत्त्वांचा संदेश देणारे भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त पिंपळे गुरव परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. येथील वर्धमान जैन स्थानकाच्या वतीने भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शेकडो जैन बांधव आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मिरवणूक पिंपळे गुरव परिसरात आली असता, राजीव गांधी प्रतिष्ठानच्या वतीने तिचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने जैन स्थानकाला श्रद्धेचे प्रतीक म्हणून आनंदऋषीजी महाराज यांची प्रतिमा आणि ‘नवकार महामंत्राची’ प्रतिमा भेट देऊन अभिवादन करण्यात आले. सामाजिक सलोखा जपणाऱ्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

मिरवणुकीच्या यशस्वी आयोजनासाठी वर्धमान जैन स्थानकाचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र कर्णावत यांच्यासह राजेंद्र भाटिया, महावीरजी रुणवाल, सुरेश दादीवाल आणि सूर्यकांत भापना यांनी विशेष परिश्रम घेतले.

तसेच, स्वागताच्या या कार्यक्रमात राजीव गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश नवले, प्रतीक नवले, विजय तातेड, अजय तातेड यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिरवणुकीदरम्यान भगवान महावीरांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. अहिंसेचा संदेश देणाऱ्या चित्ररथांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या मिरवणुकीने पिंपळे गुरवमधील धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचे दर्शन घडवले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!