news
मोशी ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्प दुर्घटना: काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांचे आयुक्तांना पत्र; ‘अँथोनी लारा’ कंपनीवर कारवाईची मागणीदापोडीत संतांच्या समता विचारांचा जागर! मुसळधार पावसात काँग्रेसकडून वारकऱ्यांना रेनकोटचे वाटपपिंपरी-चिंचवड मनपाचा ‘क्लीन वारी’ पॅटर्न यशस्वी! लाखांचा जनसमुदाय ओसरताच अवघ्या दोन तासांत शहर चकाचकपिंपरी-चिंचवड महापालिकेत जनक्षोभ! पूर ओसरल्यावरही वस्त्या गाळात, मदतीऐवजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी बैठकांमध्येच ‘व्यस्त’पिंपरी-चिंचवड पालिकेत भाजपची ‘एकहाती’ सत्ता! सर्व १० प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी भाजपचेच नगरसेवक बिनविरोध
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या खजिन्यात विक्रमी भर! महापौरांकडून ज्येष्ठ कलाकारांच्या गौरवाचीही घोषणा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या खजिन्यात विक्रमी भर! महापौरांकडून ज्येष्ठ कलाकारांच्या गौरवाचीही घोषणा

मालमत्ता करासह पाणीपट्टी व अग्निशमन विभागाने गाठला सर्वोच्चांक; शहराच्या विकासाला मिळणार मोठी गती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महसूलवाढीच्या बळावर पिंपरी-चिंचवडला अधिक सक्षम बनवणार; महापौर रवि लांडगे यांचा निर्धार

 

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले दिनांक: २ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “पिंपरी-चिंचवड शहरातील सजग करदात्यांमुळेच महापालिका विविध विकास प्रकल्प प्रभावीपणे राबवू शकत आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये नागरिकांनी दिलेला प्रतिसाद प्रेरणादायी असून, या महसूलवाढीचा उपयोग शहराच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि सार्वजनिक सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केला जाईल,” असा विश्वास महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केला.

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, उपआयुक्त सचिन पवार, अण्णा बोदडे, राजेश आगळे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये महापालिकेच्या विविध विभागांनी वसुलीचे नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत:

  • करसंकलन विभाग: सलग दुसऱ्या वर्षी साडेनऊशे कोटींचा टप्पा पार करत ९६१ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला. सुमारे ७.३२ लाख मालमत्तांपैकी ६.३१ लाख धारकांनी कर भरला.

  • अग्निशमन विभाग: मागील वर्षाच्या तुलनेत १६.६४ कोटींची वाढ नोंदवत १७९.६९ कोटींचे विक्रमी उत्पन्न मिळवले.

  • पाणीपुरवठा विभाग: इतिहासातील सर्वाधिक ८०.७४ कोटींची वसुली केली. यात सांगवी विभागाने ७.६५ कोटींसह प्रथम क्रमांक पटकावला.

  • आकाशचिन्ह व परवाना विभाग: पारदर्शक कार्यपद्धतीमुळे २१.५० कोटींची वसुली केली, जी मागील वर्षापेक्षा १ कोटीने जास्त आहे.

  • झोपडपट्टी निर्मूलन विभाग: गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक १.१० कोटी रुपयांचा सेवाकर वसूल केला.

शहराच्या औद्योगिक ओळखीसोबतच सांस्कृतिक वारसा जपणा-या ज्येष्ठ कलाकारांचा महापालिकेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार असल्याची घोषणा महापौर लांडगे यांनी केली. “ज्या कलाकारांनी साहित्य, नाट्य, संगीत आणि नृत्य क्षेत्रात शहराचे नाव उज्ज्वल केले, त्यांच्या कार्याची दखल घेणे ही आमची जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.

या सोहळ्यात मधुकर जोशी (पत्रकार व अभिनेता), धोंडीराम सायकर (तबलावादक), पद्मश्री नंदकिशोर कपोते (नर्तक), रमेश वाकनीस (लेखक), सुहास जोशी (दिग्दर्शक), अरुण बोऱ्हाडे (साहित्यिक), कल्पना क्षीरसागर, वंदना घांगुर्डे, पंडित चव्हाण (गायक), शारदा मुंढे (प्रबोधनकार), गीता शर्मा (भरतनाट्यम), डॉ. संजीवकुमार पाटील, प्रफुल्ल भिष्णूकर (चित्रकार), डॉ. मनोज देवळेकर, वैशाली धोंगडे, श्रीकृष्ण कालमित्रा, सीमा गांधी आणि संजय काळभोर या दिग्गजांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती सभापती कैलास कुटे यांनी दिली.

ऑनलाइन कर भरणा, सवलत योजना आणि पारदर्शक तंत्रज्ञानामुळे नागरिकांचा विश्वास वाढला आहे. आगामी काळात पाणीपुरवठा यंत्रणेचे सक्षमीकरण, आधुनिक अग्निशमन यंत्रणा आणि दर्जेदार रस्ते यावर विशेष भर देऊन शहराला खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ बनवण्याचा संकल्प महापौरांनी यावेळी बोलून दाखवला.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!