news
मोशी ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्प दुर्घटना: काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांचे आयुक्तांना पत्र; ‘अँथोनी लारा’ कंपनीवर कारवाईची मागणीदापोडीत संतांच्या समता विचारांचा जागर! मुसळधार पावसात काँग्रेसकडून वारकऱ्यांना रेनकोटचे वाटपपिंपरी-चिंचवड मनपाचा ‘क्लीन वारी’ पॅटर्न यशस्वी! लाखांचा जनसमुदाय ओसरताच अवघ्या दोन तासांत शहर चकाचकपिंपरी-चिंचवड महापालिकेत जनक्षोभ! पूर ओसरल्यावरही वस्त्या गाळात, मदतीऐवजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी बैठकांमध्येच ‘व्यस्त’पिंपरी-चिंचवड पालिकेत भाजपची ‘एकहाती’ सत्ता! सर्व १० प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी भाजपचेच नगरसेवक बिनविरोध
Home अकोला चान्नी पोलिसांची धडक कारवाई! घरफोडीतील १ लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने जप्त

चान्नी पोलिसांची धडक कारवाई! घरफोडीतील १ लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने जप्त

औषधोपचारासाठी नागपूरला गेलेल्या कुटुंबाचे घर फोडले; तांत्रिक तपासाच्या जोरावर बार्शिटाकळीचा चोरटा जेरबंद | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

तुलंगा बु. येथील घरफोडीचा छडा; चान्नी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

 

 

अकोला/मुर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे, दिनांक: ३ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

अकोला/चान्नी: अकोला जिल्ह्यातील चान्नी पोलिसांनी घरफोडीच्या एका मोठ्या गुन्ह्याचा छडा लावत अवघ्या काही दिवसांत आरोपीला अटक केली आहे. तांत्रिक माहिती आणि सुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी ही कारवाई केली असून, आरोपीकडून १ लाख ४० हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

तुलंगा बु. (ता. पातुर) येथील रहिवासी सौ. बेबीबाई गणेश झानोले या २२ मार्च ते २७ मार्च २०२६ दरम्यान कुटुंबासह औषधोपचारासाठी घराला कुलूप लावून नागपूर येथे गेल्या होत्या. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाचे लॉकर फोडून चोरट्याने सोन्याचे डोरले, मणी, कानातील दागिने, अंगठ्या आणि चांदीचे तोरडे असा एकूण १,५३,००० रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता. २७ मार्च रोजी घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

चान्नी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपासावरून हा आरोपी बार्शिटाकळी येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून अजय भारत डाखोरे (वय २० वर्षे, रा. इंदिरा आवास, बार्शिटाकळी, जि. अकोला) याला शिताफीने ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता, अजयने घरफोडीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी १ लाख ४० हजार रुपये किमतीची सोन्याची दानी आणि अंगठी जप्त केली आहे.

सदरची कारवाई अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत बी. रेड्डी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (बाळापूर) गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र लांडे, पोलीस उपनिरीक्षक विजय घुगे, पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर करतते आणि राहुल महाजन यांचा समावेश होता.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय घुगे करत आहेत. घरफोडीचा आरोपी तातडीने गजाआड झाल्यामुळे चान्नी परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!