news
Home पिंपरी चिंचवड पालकांनो, प्रवेश घेण्यापूर्वी शाळा तपासा! पिंपरी-चिंचवडमधील १० शाळांना प्रशासकीय परवानगी नसल्याचे स्पष्ट

पालकांनो, प्रवेश घेण्यापूर्वी शाळा तपासा! पिंपरी-चिंचवडमधील १० शाळांना प्रशासकीय परवानगी नसल्याचे स्पष्ट

प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांचे पाल्यांच्या भविष्यासाठी सतर्कतेचे आवाहन; अनधिकृत शाळांना नोटीस | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

सावधान! पिंपरी चिंचवडमधील १० इंग्रजी माध्यमाच्या शाळा अनधिकृत; पालकांना पाल्यांचे प्रवेश न घेण्याचे आवाहन

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , १६ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: सन २०२६-२७ हे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १० खाजगी इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरित्या सुरू असल्याचे उघड झाले आहे. या शाळांना यापूर्वीच टाळे ठोकण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही या शाळा सुरू असल्याने शिक्षण विभागाने पालकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, अनधिकृत शाळांमध्ये पाल्यांचे प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर आणि भविष्यातील मान्यतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. अशा शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास होणाऱ्या नुकसानीस पालक स्वतः जबाबदार राहतील, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

अनधिकृत शाळांची यादी खालीलप्रमाणे:

१. ब्लोमिंग बर्ड्स, ताथवडे

२. लिटील स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल, चिंचवडेनगर

३. माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल, कासारवाडी

४. डी. एम. के. इंटरनॅशनल स्कूल, कासारवाडी

५. माने इंग्लिश मिडीयम स्कूल, काळेवाडी

६. नर्चर इंटरनॅशनल स्कूल, काळजेवाडी, चऱ्होली

७. माईंडवर्ल्ड इंटरनॅशनल स्कूल, काळजेवाडी, चऱ्होली

८. हेम्स इंटरनॅशनल स्कूल, वाकड

९. कॅटलिस्ट इंटरनॅशनल स्कूल, चऱ्होली फाटा

१०. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल, मोशी

संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना इशारा देण्यात आला आहे की, आवश्यक परवानगीशिवाय शाळा सुरू ठेवल्यास महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या नियमांनुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. पालकांनी आपल्या पाल्याच्या भविष्याचा विचार करून केवळ शासनमान्य आणि अधिकृत शाळांमध्येच प्रवेश घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!