news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमधील तरुणाई आता होणार ‘स्किलफुल’! यमुनानगर लाईटहाऊसच्या माध्यमातून शेकडो युवकांच्या हाताला काम

पिंपरी-चिंचवडमधील तरुणाई आता होणार ‘स्किलफुल’! यमुनानगर लाईटहाऊसच्या माध्यमातून शेकडो युवकांच्या हाताला काम

निगडी येथील यमुनानगर कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पाची महापौरांनी केली पाहणी; यशस्वी युवकांचा केला गौरव | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

कौशल्यम लाईटहाऊस सारख्या प्रकल्पामुळे युवकांना रोजगाराच्या नव्या संधी – महापौर रवि लांडगे

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १७ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “बदलत्या काळानुसार कौशल्याधारित शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे. कौशल्यम लाईटहाऊससारख्या प्रकल्पांमुळे युवकांना केवळ नोकरीच नव्हे, तर स्वावलंबी होण्याची संधी मिळत आहे. प्रत्येक तरुण-तरुणीला रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिका सदैव प्रयत्नशील राहील,” असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

निगडी येथील यमुनानगर परिसरातील कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पाला महापौर रवि लांडगे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशिक्षण प्रक्रियेचा आढावा घेतला आणि यशस्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचा गौरव केला.

याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसदस्य उत्तम केंदळे, अनिल घोलप, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, लाईट हाऊस कम्युनिटीजच्या सीईओ अमृता बहुलेकर, प्रकल्प प्रमुख दीपिका केडिया तसेच लखन रोकडे, अक्षय किटे, वैभव कोल्हे, अभिजित कांबळे आदी उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले की, महापालिका प्रशासनामार्फत ‘महापौर युवा रोजगार संकल्प योजना’ प्रभावीपणे राबविली जात असून त्यातून मोठी रोजगारनिर्मिती होत आहे. भविष्यात कौशल्यम लाईटहाऊस सारख्या प्रकल्पांचा विस्तार करून शहरातील अधिकाधिक तरुणांना सक्षम करण्याचा आमचा मानस आहे. प्रशिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी प्राप्त झालेल्या व कौशल्य विकास कोर्स पूर्ण केलेल्या युवक-युवतींचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये:

  • नोकरी प्राप्त विद्यार्थी: शिवमूर्ती सोनटक्के, सुमेधा ढाके, सुमित कुंभकरण, शंकर प्रसाद, रुचा लोंढे, अक्षय माने.

  • कौशल्य कोर्स पूर्ण केलेले विद्यार्थी: ओम सुर्वे, सचिन जाधव, प्रीती कोळेकर, आरती होलाडे.

कौशल्य विकासाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमधील युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार महापौरांनी यावेळी केला.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!