news
Home पिंपरी चिंचवड चालत्या कारचा पिंपळे सौदागरमध्ये ‘भडका’! आगीच्या ज्वाळांनी वाहन वेढले; चालकाच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले

चालत्या कारचा पिंपळे सौदागरमध्ये ‘भडका’! आगीच्या ज्वाळांनी वाहन वेढले; चालकाच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले

लीनिअर गार्डन जवळील घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपळे सौदागरमध्ये चालती कार जळून खाक; सुदैवाने जीवितहानी टळली

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, २१ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: शहरातील पिंपळे सौदागर येथील लीनिअर गार्डन परिसरात रात्रीच्या सुमारास एका चालत्या चारचाकी वाहनाला भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. आगीचे स्वरूप इतके रौद्र होते की, काही वेळातच संपूर्ण वाहन जळून खाक झाले. मात्र, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चारचाकी वाहन लीनिअर गार्डन परिसरातील मुख्य रस्त्यावरून जात असताना अचानक इंजिनच्या भागातून धूर निघू लागला आणि गाडीने पेट घेतला. आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण गाडीला विळखा घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. रस्त्यावरील इतर वाहनचालकांनी तातडीने सुरक्षित अंतर राखले.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबासह घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या वेळीच हस्तक्षेपामुळे ही आग शेजारील झाडांना किंवा इतर वाहनांना लागली नाही, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी तातडीने या मार्गावरील वाहतूक थांबवून बॅरिकेड्स लावले होते. आग पूर्णपणे विझल्यानंतर आणि जळालेले वाहन बाजूला केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्वपदावर आली.

ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, उन्हाळ्याचे दिवस असल्याने शॉर्ट सर्किटमुळे किंवा इंजिन ओव्हरहीट झाल्याने ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!