news
पिंपरीत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा भव्य कामगार मेळावा; कंत्राटदारांच्या मनमानी कारभाराविरोधात यशवंतभाऊ भोसले कडाडले!पिंपरी-चिंचवडचे २१ ‘बाहुबली’ खेळाडू आंतरराष्ट्रीय मैदानावर फडकवणार तिरंगा; भारतीय सिलंबम संघात झाली निवड!भोसरी एमआयडीसीतील बकाल कारभाराविरोधात उद्योजक आक्रमक; ७२ तासांत अतिक्रमण न हटवल्यास मनपा भवनाला टाळे ठोकण्याचा इशारा!पुणे महापालिकेत ऐतिहासिक दर्गा तोडल्याप्रकरणी प्रचंड गदारोळ; राष्ट्रवादीचे नगरसेवक गफूर पठाण यांच्या अंगावर धावले भाजप नगरसेवक!पिंपरी-चिंचवड मनपाच्या ‘झिरो वेस्ट’ मोहिमेला अथांग यश; महिनाभरात ११ हजार किलोहून अधिक कचऱ्याचे स्रोतस्तरावर वर्गीकरण!
Home पिंपरी चिंचवड बुलेट चोरांच्या टोळीचा महाळुंगे पोलिसांकडून पर्दाफाश! २४ दुचाकींसह ३६ लाखांचा माल जप्त

बुलेट चोरांच्या टोळीचा महाळुंगे पोलिसांकडून पर्दाफाश! २४ दुचाकींसह ३६ लाखांचा माल जप्त

मुंबई ते नाशिकपर्यंत पसरलेले चोरीचे जाळे उद्ध्वस्त; ८० कि.मी.चा सीसीटीव्ही माग काढत जुन्नरच्या दोघांना ठोकल्या बेड्या | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

दक्षिण महाळुंगे MIDC पोलिसांची मोठी कारवाई; आंतरजिल्हा दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या, ३६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ७ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

चाकण-महाळुंगे: महाळुंगे औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या पार्किंगमधून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ३६ लाख रुपये किमतीच्या एकूण २४ मोटार सायकली हस्तगत केल्या असून जुन्नर तालुक्यातील दोन अट्टल चोरांना अटक केली आहे.

दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी महाळुंगे येथील ‘पानसे ऑटो प्रा. लि.’ कंपनीच्या पार्किंगमधून एक स्प्लेंडर मोटार सायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी संदीपकुमार निसाद यांनी फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास करताना तपास पथकाने महाळुंगे ते जुन्नर या दरम्यानच्या सुमारे ८० किलोमीटर अंतरातील सीसीटीव्ही फुटेजची अतिशय बारकाईने पाहणी केली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला आणि यश सुनील हांडे (वय १९, रा. पिंपळगाव सौदा, जुन्नर)किरण संभाजी जाधव (वय २६, रा. टिकेकरवाडी, जुन्नर) या दोघांना ताब्यात घेतले.

आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी केवळ पिंपरी-चिंचवडच नव्हे, तर पुणे, नवी मुंबई, बृहन्मुंबई, ठाणे, नाशिक आणि अहिल्यानगर (अहमदनगर) या जिल्ह्यांमधूनही मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

जप्त केलेल्या २४ वाहनांमध्ये प्रामुख्याने खालील गाड्यांचा समावेश आहे:

  • रॉयल इनफिल्ड (बुलेट): १२ गाड्या

  • यमाहा आर वन फाईव्ह (R15): ३ गाड्या

  • होन्डा शाईन, स्प्लेंडर, पल्सर, यूनिकॉर्न व स्कूटी.

या कारवाईमुळे चिखली, चाकण, आळंदी, जुन्नर (पुणे), मुलुंड, सायन, नवघर, कांजुरमार्ग (मुंबई), नवपाडा, कोळसेवाडी, अंबरनाथ (ठाणे), सानपाडा (नवी मुंबई), नाशिक आणि अहिल्यानगरमधील एकूण २४ गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, सपोनि भास्कर पुल्ली आणि पोलीस अंमलदार चेतन सावंत, युवराज बिराजदार, विश्वास नाणेकर, किशोर सांगळे, शरद खैरे, राजेंद्र खेडकर व पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार चेतन सावंत करत आहेत.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!