news
पिंपरीत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा भव्य कामगार मेळावा; कंत्राटदारांच्या मनमानी कारभाराविरोधात यशवंतभाऊ भोसले कडाडले!पिंपरी-चिंचवडचे २१ ‘बाहुबली’ खेळाडू आंतरराष्ट्रीय मैदानावर फडकवणार तिरंगा; भारतीय सिलंबम संघात झाली निवड!भोसरी एमआयडीसीतील बकाल कारभाराविरोधात उद्योजक आक्रमक; ७२ तासांत अतिक्रमण न हटवल्यास मनपा भवनाला टाळे ठोकण्याचा इशारा!पुणे महापालिकेत ऐतिहासिक दर्गा तोडल्याप्रकरणी प्रचंड गदारोळ; राष्ट्रवादीचे नगरसेवक गफूर पठाण यांच्या अंगावर धावले भाजप नगरसेवक!पिंपरी-चिंचवड मनपाच्या ‘झिरो वेस्ट’ मोहिमेला अथांग यश; महिनाभरात ११ हजार किलोहून अधिक कचऱ्याचे स्रोतस्तरावर वर्गीकरण!
Home पिंपरी चिंचवड PCMC स्थायी समितीत नावाचा बनाव! संदीप वाघेरे आक्रमक; ठराव रद्द करण्याची आयुक्तांकडे मागणी

PCMC स्थायी समितीत नावाचा बनाव! संदीप वाघेरे आक्रमक; ठराव रद्द करण्याची आयुक्तांकडे मागणी

स्थायी समितीतील 'त्या' ठरावावरून नवा वाद; प्रशासकीय घोळाचा की भ्रष्टाचाराचा प्रकार? वाघेरेंनी पुराव्यासह वेधले लक्ष | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

“माझ्या नावाचा गैरवापर करून ठराव मंजूर, संबंधितांवर कारवाई करा”; राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वाघेरे यांचे आयुक्त व सभापतींना निवेदन

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , ७ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये आपल्या संमतीशिवाय नावाचा वापर करून ठराव मंजूर केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित ठराव तात्काळ रद्द करावा आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वाघेरे यांनी महापालिका आयुक्त आणि स्थायी समिती सभापतींकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संदीप वाघेरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल २०२६ रोजी स्थायी समितीची सभा पार पडली. या सभेमध्ये शिक्षण समितीचा एक ठराव (क्र. ७, दिनांक ०२/०४/२०२६) मंजुरीसाठी आला होता. नगरसचिव कार्यालयामार्फत सादर करण्यात आलेल्या डॉकेटमध्ये या ठरावासाठी संदीप वाघेरे यांचे नाव “सूचक” म्हणून, तर विकास साने यांचे नाव “अनुमोदक” म्हणून नोंदवण्यात आले होते.

मात्र, संदीप वाघेरे यांनी स्पष्ट केले की, आपण अशा कोणत्याही विषयाला संमती दिलेली नाही किंवा तसा ठराव सुचवलेलाही नाही. नगरसचिव कार्यालयाने जाणीवपूर्वक किंवा चुकीच्या पद्धतीने आपल्या नावाचा वापर करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

वाघेरे यांनी केवळ नावाच्या गैरवापराचा मुद्दाच मांडला नाही, तर या ठरावातील आर्थिक बाबींवरही बोट ठेवले आहे. संबंधित विषयात ‘यंत्रमाग’ आणि ‘जगदंब’ या दोन्ही संस्था शासकीय असतानाही, जगदंब संस्थेच्या दरामध्ये मोठी तफावत आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या तिजोरीवर प्रति विद्यार्थी आणि प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात विनाकारण आर्थिक बोजा वाढणार असल्याचे वाघेरे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

स्थायी समिती ठराव क्रमांक ३६६ (विषय क्रमांक ७) तात्काळ रद्द करण्यात यावा, ठरावावरून संदीप वाघेरे यांचे नाव तातडीने हटवण्यात यावे,

चुकीची नोंद करणाऱ्या संबंधित नगरसचिव आणि कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी.

या प्रकरणामुळे महापालिकेच्या नगरसचिव विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!