news
पिंपरी पालिकेचा अजब कारभार! खासगी संस्थेला १ कोटींचा निधी, पण पालिकेच्याच यशवंतराव चव्हाण स्मारकाची दुरवस्थापरीक्षार्थींसाठी महत्त्वाची बातमी! ‘महाटीईटी’ परीक्षा पुढे ढकलली; ‘नीट’ परीक्षेमुळे परीक्षा परिषदेचा मोठा निर्णयअपघातग्रस्तांसाठी केंद्र सरकारचे मोठे पाऊल! ‘पीएम राहत’ योजनेतून दीड लाखांपर्यंत कॅशलेस आणि मोफत उपचारमहापौर थेट सायकलवरून पोहोचले महापालिकेत! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर रवि लांडगे यांचा अनोखा पुढाकारपिंपरी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सूर-ताल घुमला! ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापालिकेकडून भव्य नागरी सत्कार
Home अमरावती अपघातग्रस्तांसाठी केंद्र सरकारचे मोठे पाऊल! ‘पीएम राहत’ योजनेतून दीड लाखांपर्यंत कॅशलेस आणि मोफत उपचार

अपघातग्रस्तांसाठी केंद्र सरकारचे मोठे पाऊल! ‘पीएम राहत’ योजनेतून दीड लाखांपर्यंत कॅशलेस आणि मोफत उपचार

अमरावती जिल्ह्यातील ४० रुग्णालयांमध्ये सुविधा उपलब्ध; 'गोल्डन अवर'मध्ये कागदपत्रांशिवाय तातडीने सुरू होणार उपचार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

रस्ते अपघातग्रस्तांसाठी ‘पीएम राहत’ योजना; दीड लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार

अमरावती प्रतिनिधी विलास सावळे, १५ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: रस्ते अपघातातील जखमींना तातडीने आणि वेळेवर उपचार मिळून त्यांचे प्राण वाचावेत, यासाठी केंद्र सरकारने ‘पीएम राहत’ ही अत्यंत महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असून, अपघातग्रस्तांना आता १.५ लाख रुपयांपर्यंत मोफत कॅशलेस उपचार मिळणार आहेत.

अपघातानंतरचा पहिला तास (गोल्डन अवर) हा जखमीचा जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात पैशांअभावी उपचार थांबू नयेत, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे.

 अपघाताच्या तारखेपासून जास्तीत जास्त ७ दिवसांपर्यंत १ लाख ५० हजार रुपयांपर्यंतचे सर्व वैद्यकीय उपचार पूर्णपणे मोफत दिले जातील. आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णावर तात्काळ उपचार व्हावेत, यासाठी या योजनेचा लाभ घेताना कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची सक्ती करण्यात आलेली नाही.या योजनेअंतर्गत उपचारासाठी होणारा सर्व खर्च ‘मोटार वाहन अपघात निधी’ मधून थेट केला जाणार आहे.

जिल्ह्यातील आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत (Empaneled) असलेल्या ४० रुग्णालयांमध्ये अपघातग्रस्तांना या योजनेचा लाभ घेता येईल. ही योजना यशस्वी करण्यासाठी रुग्णालय, पोलीस विभाग, राज्य आरोग्य संस्था आणि आपत्कालीन सेवा (Ambulance Services) यांच्यात उत्तम समन्वय साधण्यात आला आहे.

रस्ते अपघाताच्या प्रसंगी गरजू नागरिकांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी म्हणून या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी संयुक्तपणे केले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!