news
पिंपरी पालिकेचा अजब कारभार! खासगी संस्थेला १ कोटींचा निधी, पण पालिकेच्याच यशवंतराव चव्हाण स्मारकाची दुरवस्थापरीक्षार्थींसाठी महत्त्वाची बातमी! ‘महाटीईटी’ परीक्षा पुढे ढकलली; ‘नीट’ परीक्षेमुळे परीक्षा परिषदेचा मोठा निर्णयअपघातग्रस्तांसाठी केंद्र सरकारचे मोठे पाऊल! ‘पीएम राहत’ योजनेतून दीड लाखांपर्यंत कॅशलेस आणि मोफत उपचारमहापौर थेट सायकलवरून पोहोचले महापालिकेत! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर रवि लांडगे यांचा अनोखा पुढाकारपिंपरी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सूर-ताल घुमला! ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापालिकेकडून भव्य नागरी सत्कार
Home पिंपरी चिंचवड परीक्षार्थींसाठी महत्त्वाची बातमी! ‘महाटीईटी’ परीक्षा पुढे ढकलली; ‘नीट’ परीक्षेमुळे परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय

परीक्षार्थींसाठी महत्त्वाची बातमी! ‘महाटीईटी’ परीक्षा पुढे ढकलली; ‘नीट’ परीक्षेमुळे परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय

'नीट' परीक्षेमुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय; १६ जूनपासून प्रवेशपत्रे उपलब्ध | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘महाटीईटी’ परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; आता २१ ऐवजी २८ जून रोजी होणार परीक्षा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १५ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार, २१ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) – २०२६’ आता पुढे ढकलण्यात आली असून ती २८ जून २०२६ रोजी घेतली जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (NTA) २१ जून रोजीच देशभरात ‘नीट’ (NEET) परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही परीक्षांसाठी अनेक परीक्षा केंद्रे सामायिक (सारखीच) असल्यामुळे ही परीक्षा सुरळीत पार पडावी आणि परीक्षार्थींची गैरसोय टाळावी, या उद्देशाने परिषदेने हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे, अशी माहिती परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

                   परीक्षेचे सुधारित वेळापत्रक (२८ जून २०२६):

पेपर क्रमांक १ : सकाळी १०:३० ते दुपारी १:०० या वेळेत पार पडेल.

पेपर क्रमांक २ : दुपारी २:३० ते सायंकाळी ५:०० या वेळेत पार पडेल.

या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना १६ जून ते २८ जून २०२६ या कालावधीत परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्रे (Hall Tickets) ऑनलाईन डाऊनलोड करता येतील.

भविष्यात प्रशासकीय कारणास्तव वेळापत्रकात पुन्हा काही बदल झाल्यास, त्याची अधिकृत माहिती https://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे उमेदवारांनी इतर कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे करण्यात आले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!