आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्त पिंपरीत भाजपचा ‘महासंकल्प’; काँग्रेसच्या काळ्या इतिहासाचा तीव्र निषेध
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २६ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “२५ जून १९७५ हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात काळा आणि दुर्दैवी दिवस आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारने केवळ स्वतःची सत्ता आणि खुर्ची वाचवण्यासाठी संपूर्ण देशावर आणीबाणी लादली, लाखो देशभक्तांना विनाकारण तुरुंगात डांबले आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य अत्यंत क्रूरपणे हिरावून घेतले. ज्या काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करण्याचे अक्षम्य पाप केले, त्यांचा हा काळा इतिहास आजच्या तरुण पिढीसमोर आणून त्यांचा बुरखा फाडणे हे आपले परम कर्तव्य आहे,” असा घणाघाती प्रहार भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा लोकप्रिय नगरसेवक श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केला.
२५ जून १९७५ रोजी देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला ५१ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या आणि काँग्रेसच्या हुकूमशाही राजवटीचा निषेध करण्यासाठी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ भाजप युवा मोर्चाच्या वतीने भव्य ‘युवा संकल्प सभे’चे आयोजन करण्यात आले होते. या सभेप्रसंगी उपस्थित युवा कार्यकर्त्यांना संबोधित करताना शत्रुघ्न काटे बोलत होते.
या विशेष कार्यक्रमात आणीबाणीच्या जुलमी काळाचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. तसेच, तत्कालीन शासनाच्या दडपशाहीविरुद्ध लढा देऊन लोकशाहीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कडक तुरुंगवास भोगणाऱ्या, अतोनात हाल सोसणाऱ्या आणि आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अथांग देशभक्तांच्या त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून त्यांना मनोभावे नमन करण्यात आले.
यावेळी उपस्थित भाजपच्या शेकडो युवा कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर उभे राहून लोकशाही रक्षणाचा सामूहिक महासंकल्प केला. “भविष्यात जर कोणीही भारताची लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पवित्र संविधान संपवण्याचा किंवा त्याला धक्का लावण्याचा प्रयत्न केला, तर भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करेल आणि संविधानाचे रक्षण करेल,” असा सिंहगर्जनायुक्त निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

या आक्रमक आणि यशस्वी युवा संकल्प सभेचे संयोजन व नियोजन अत्यंत चोखपणे करण्यात आले होते. कार्यक्रमाला भाजपचे अनेक वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी आणि आघाड्यांचे प्रमुख उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने, मोरेश्वरभाऊ शेडगे (संघटन सरचिटणीस व मुख्य कार्यक्रम संयोजक, पिंपरी-चिंचवड भाजप), श्री. दिनेशभाऊ यादव (अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड), श्री. सुरेशभाऊ भोईर (नगरसेवक, पिंपरी-चिंचवड), श्री. मंदार देशपांडे (नगरसेवक, पिंपरी-चिंचवड), श्री. सागर गवळी (भाजप पदाधिकारी), श्री. अजयभाऊ पाताडे (भाजप पदाधिकारी), श्री. अजितभाऊ कुलथे (भाजप पदाधिकारी), श्री. दिनेश काटे पाटील (भाजप पदाधिकारी), श्री. कैलासभाऊ सानप (भाजप पदाधिकारी), श्री. देवदत्तभाऊ लांडे (भाजप पदाधिकारी) तसेच पक्षाचे सक्रिय आणि तरुण कार्यकर्ते सम्यक साबळे, राहुल खाडे, दिनेश काटे, सुमित घाटे, राजेश डोंगरे, कृष्णा कदम, प्रशांत अलमेल, प्रदीप महाजन, यश संभेराव, ऋषिकेश भालेकर, शरद भालेकर, आदित्य कुलकर्णी, दिपराज गुप्ता, रमेश वहीले, अमित देशमुख, आशिष राऊत, गोपाल मंडल, निखिल शहाणे, अभिजीत बागुल, प्रथमेश रुपनर, जगदीश येवले, स्वप्निल गाडे, रोहित कराळे, विजय दळवी, मयूर काळभोर, विवेक बारोट, सतीश नागरगोजे, प्रदीप नाईक, अजिंक्य गोळे, संग्राम खाडे आणि दयानंद बंडगर यांच्यासह प्रतीक भालेराव व पिंपरी-चिंचवडमधील अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते, राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ भाजप माध्यम प्रसिद्धी विभाग, पिंपरी-चिंचवड शहर.

