news
Home पिंपरी चिंचवड पोलीस दलातील प्रदीर्घ सेवेचा गौरव; पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ७ कर्तव्यदक्षांना भावपूर्ण निरोप!

पोलीस दलातील प्रदीर्घ सेवेचा गौरव; पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ७ कर्तव्यदक्षांना भावपूर्ण निरोप!

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर व अपर आयुक्त सारंग आवाड यांच्या हस्ते 'शिवनेरी हॉल'मध्ये सन्मान सोहळा; डीसीपी गणेश इंगळे यांच्या उपस्थितीत कुटुंबियांसह सत्कार करून पुढील प्रवासासाठी दिल्या सदिच्छा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ७ पोलीस अधिकारी व अंमलदार सेवामुक्त; पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते ‘शिवनेरी हॉल’मध्ये भावपूर्ण निरोप

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, ३० जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील ७ पोलीस अधिकारी व अंमलदार माहे जून २०२६ मध्ये नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले आहेत. या सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सत्कार व भावपूर्ण निरोप समारंभ कार्यक्रम आज, दिनांक ३० जून २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथील ‘शिवनेरी हॉल’ येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदीर्घ काळ पोलीस दलात अत्यंत निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने सेवा बजावलेल्या या सर्व वीरांच्या कामगिरीचा गौरव यावेळी करण्यात आला.

सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार  १. श्री. सतिष विठ्ठलराव नांदुरकर – सहायक पोलीस आयुक्त (ACP), वाहतुक विभाग २. श्री. दिपक रामदास साळुंके – सहायक पोलीस आयुक्त (ACP), अभियान ३. श्री. शंकर रामभाऊ डामसे – पोलीस निरीक्षक (PI), वाहतुक विभाग ४. श्री. शांताराम शिवाजी उमे – श्रेणी पोलीस उपनिरीक्षक (ASI), वाहतुक विभाग ५. श्री. रागदारा बापु नरवडे – श्रेणी पोलीस उपनिरीक्षक (ASI), चिंचवड पोलीस स्टेशन ६. श्री. उन्मेश अनंत जोशी – सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI), बिनतारी संदेश विभाग ७. श्री. राजू त्रिंबक केदारी – पोलीस हवालदार (ब.नं. ३१२), पोलीस मुख्यालय

 या आयोजित सोहळ्यात मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. पोलीस सह आयुक्त श्री. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड आणि मा. पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) श्री. गणेश इंगळे यांनी सेवानिवृत्त झालेल्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांचा त्यांच्या कुटुंबियांसह जाहीर सत्कार केला. सर्व सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सेवानिवृत्ती प्रमाणपत्र, नवीन ओळखपत्र, शुभेच्छापत्र, स्मृतिचिन्ह, पर्यावरणाचा संदेश देणारे झाडाचे रोपटे व आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना व त्यांच्या नातेवाईकांना पुढील समृद्ध आयुष्य व उत्तम आरोग्याकरिता मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या निरोप समारंभाच्या कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय नरावाड (कल्याण शाखा), सहायक पोलीस निरीक्षक श्री. राकेश भामरे (कल्याण शाखा) यांच्यासह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी, अंमलदार, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा संपूर्ण सोहळा भावुक आणि तितकाच सन्मानजनक वातावरणात पार पडला.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!