पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून ५७ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते कृतज्ञता सन्मान सोहळा संपन्न
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान , ३० जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड : “महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये प्रदीर्घ काळ अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने सेवा बजावून सेवानिवृत्त होत असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी हे महापालिकेच्या कुटुंबातील महत्त्वाचे घटक आहेत. महापालिकेच्या जडणघडणीत आणि पिंपरी चिंचवड शहराच्या वैभवात व विकासात या कर्मचाऱ्यांनी आपले मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या प्रदीर्घ सेवाकार्याचा गौरव करणे हे आपले कर्तव्य असून, त्यांच्या पाठीशी महापालिका प्रशासन सदैव खंबीरपणे उभे राहील,” अशी अत्यंत संवेदनशील आणि कामगारस्नेही भावना पिंपरी चिंचवडच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी व्यक्त केली.
महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य सेवानिवृत्ती सन्मान समारंभात जून २०२६ अखेर सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व ५७ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. उपमहापौरांनी प्रत्येक कर्मचाऱ्याशी वैयक्तिक संवाद साधत त्यांच्या भविष्यातील आरोग्यासाठी आणि वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या, ज्यामुळे कामगार व कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदराचे स्थान निर्माण झाले आहे.

या सन्मान सोहळ्यास कामगार कल्याण विभागाचे सहायक आयुक्त तानाजी नरळे, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच कर्मचारी महासंघाचे उमेश बांदल, नंदकुमार इंदलकर, विविध विभागांतील कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सोहळ्यात जून २०२६ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे ४२ आणि स्वेच्छा सेवानिवृत्ती (VRS) स्वीकारलेले १५ अशा एकूण ५७ कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
-
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी: कार्यकारी अभियंता सुदर्शन वहीकर, उपअभियंता (विद्युत) श्यामसुंदर बनसोडे, प्रशासन अधिकारी जयवंत निरगुडे, असिस्टंट मेट्रन प्रतिभा नाईकरे, मुख्याध्यापक निर्मला खुडे, सायराबानू शिकलगार, सुनंदा कोंडे, विजया ढमाले, आशा निचळ, बाळुबाई माळी, स्नेहला मोरे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) अनिल झोडे, शामसुंदर भंडारी, उपशिक्षक मीना पवार, रफियासुल्ताना सय्यद, अय्याज मोमीन, विजया भूतकर, संगीता पाटील, आरोग्य निरीक्षक राजेंद्र उजिनवाल, फिटर पद्माकर सावंत, वायरमन रोहिदास गोळे, वॉर्ड बॉय तानाजी दुदुस्कर, हनुमंत सोनवणे, रखवालदार दामू मुठे, हंबीर बवले, राजेंद्र पवार, शिपाई पंडीत साखरे, मजूर शंकर देवकर, बाळासाहेब कडू, सुरेश फुगे, सुनिल बहिरट, रामदास जाधव, रामअवध गोड, शंकर नवरंग, रमाकांत सुर्वे, संजय असवलीकर, मधुकर सुतार, नाईक बाळा पवार, स्प्रे कुली पाडुंरग डामसे, सफाई कामगार संभाजी गोरखे, मृणालिनी रणपिसे तसेच गटरकुली मल्हारी अवतारे.
-
स्वेच्छा सेवानिवृत्ती (VRS) घेतलेले कर्मचारी: सफाई कामगार संतोष जगताप, रविंद्र शिंदे, पारुवाई बचुटे, अलका खेंग्रे, मुनिता जाधव, लता कंडारा, लक्ष्मी घोडेस्वार, मुदलीयार मोतीराम, निशा नेटके, अनिता बनसोडे, सुनिता साळवे, स्प्रे कुली दत्तात्रय बालघरे, सफाई सेवक प्रभाकर वाघमारे, गटरकुली दाजी करवंदे आणि रमेश हेंद्रे.
उपमहापौर शर्मिला बाबर यांनी वर्ग १ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते वर्ग ४ च्या सफाई सेवकांपर्यंत सर्वांचाच अत्यंत आदराने आणि सन्मानाने सत्कार केला. उपमहापौरांच्या या आपुलकीच्या आणि आदराच्या वागणुकीमुळे सेवानिवृत्त होणारे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय भावुक झाले होते. महापालिकेच्या प्रत्येक लहान-मोठ्या कर्मचाऱ्याच्या कष्टाची जाणीव ठेवणारे नेतृत्व म्हणून उपमहापौरांच्या या भूमिकेचे कामगार संघटना व नागरिकांमधून कौतुक होत आहे.
कार्यक्रमाचे सुंदर प्रास्ताविक सहायक आयुक्त तानाजी नरळे यांनी केले, तर सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने पार पाडले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्य लिपिक माया वाकडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
