news
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला पिंपरी-चिंचवडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारो कामगार, महिला व युवकांचा भव्य सहभाग‘यशस्वी’ संस्थेत ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; ‘यशोगाथा’ विशेषांकाचे भव्य प्रकाशनपिंपरी-चिंचवड महापालिका ‘ह’ प्रभाग अध्यक्षा नगरसेविका तृप्तीताई कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण व १०० राष्ट्रध्वजांचे वितरणरहाटणीत देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमला; महापालिका ‘ड’ प्रभाग सभापती सविताताई खुळे यांच्या हस्ते ध्वजवंदनपिंपरी वाघेरे येथील कन्या विद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
Home पुणे चिंबळीत ‘आनंद मार्ग’ संस्थेचा तीन दिवसीय मोफत योग परिसंवाद उत्साहात; शेकडो साधकांनी घेतला लाभ!

चिंबळीत ‘आनंद मार्ग’ संस्थेचा तीन दिवसीय मोफत योग परिसंवाद उत्साहात; शेकडो साधकांनी घेतला लाभ!

आचार्य सिद्धविद्यानंद अवधूत यांच्या मार्गदर्शनाखाली ताणतणाव मुक्तीचे धडे; प्रफुल्ल भावेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या शिबिराची पुणे पत्रकार संघात माहिती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

योग, ध्यान आणि सर्वांगीण आरोग्यासाठी आनंद मार्गचा मोफत योग परिसंवाद संपन्न; चिंबळी येथील तीन दिवसीय उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद

 

 

 

पुणे/पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ३० जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे : नागरिकांचे शारीरिक स्वास्थ्य, मानसिक संतुलन, नैतिक मूल्ये आणि आध्यात्मिक जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने आनंद मार्ग प्रचारक संघ, पुणे यांच्या वतीने चिंबळी येथे आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय मोफत योग परिसंवाद अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या परिसंवादातून समाजात निरोगी जीवनशैली, मानसिक शांतता आणि सामूहिक कल्याणाविषयी जनजागृती होण्यास मोठी मदत झाली असून, शेकडो नागरिकांनी याचा लाभ घेतल्याची माहिती आज पुणे पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन मुख्य प्रशिक्षक आचार्य सिद्धविद्यानंद अवधूत यांच्या हस्ते करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या मोफत योग परिसंवादामध्ये आचार्य सिद्धविद्यानंद अवधूत यांच्यासह आचार्य योगेश्वरानंद अवधूत, आचार्य रागतीतानंद अवधूत आणि आचार्य निर्भयानंद अवधूत यांनी उपस्थितांना योग व साधनेचे सखोल धडे दिले. त्याचप्रमाणे श्री प्रफुल्ल भावेकर आणि भुक्ती प्रधान यांनीही विविध सत्रांमध्ये साधकांना बहुमोल मार्गदर्शन केले.

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य प्रशिक्षक आचार्य सिद्धविद्यानंद अवधूत यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, “आनंद मार्ग ही १९५० मध्ये श्रद्धेय श्री श्री आनंदमूर्तीजी यांनी स्थापन केलेली एक जागतिक सामाजिक व आध्यात्मिक संस्था आहे. योग, ध्यान, मानवसेवा आणि आध्यात्मिक साधनेद्वारे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी ही संस्था जगभर निरंतर कार्यरत आहे.”

आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक जीवनशैलीत वाढत्या ताणतणावावर (Stress) मात करण्यासाठी योग आणि ध्यान किती महत्त्वाचे आहे, याचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन या शिबिरात करण्यात आले. शिस्तबद्ध जीवनशैली कशी अंगीकारावी आणि मन कशा प्रकारे शांत ठेवावे, याबद्दल साधकांना प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. या तीन दिवसीय परिसंवादात परिसरातील शेकडो नागरिक, विद्यार्थी, योगसाधक आणि स्थानिक रहिवाशांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या सुवर्णसंधीचा लाभ घेतला आणि आनंद मार्गच्या या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!