सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अमरावती येथे भारती वॉशिंग कंपनीच्या हायटेक वस्त्र धुलाई केंद्राचे भव्य उद्घाटन
अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, ३० जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा “भारती वॉशिंग कंपनी – हायटेक वस्त्र धुलाई केंद्र” चा भव्य उद्घाटन समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न होणार आहे. या अत्याधुनिक केंद्रामुळे रुग्णालयातील स्वच्छता आणि रुग्णसेवेचा दर्जा अधिक उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.
या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र शासन आश्वासन समितीचे अध्यक्ष मा. श्री. रविभाऊ राणा उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावतीचे माजी पालकमंत्री मा. श्री. सुनीलभाऊ देशमुख विराजमान राहतील.

याप्रसंगी माजी शिक्षण सभापती मा. श्री. आशीष कुमार गावंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे आरएमओ (RMO) श्री. महादेव धोपरे, श्री. अशोक धोटे, श्री. अशोक बुंदेले, श्री. राधेश्याम चंदेले, श्री. संतोष किल्लेकर आणि श्री. संजय बुंदेले यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू होणाऱ्या या हायटेक वस्त्र धुलाई केंद्रामध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केला जाणार आहे. याद्वारे रुग्णालयातील लिनेन, बेडशीट, डॉक्टरांचे गणवेश व इतर सर्व वस्त्रांची अत्यंत स्वच्छ, निर्जंतुकीकरणयुक्त (Sterilized) आणि गुणवत्तापूर्ण धुलाई केली जाणार आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य असते, हीच गरज ओळखून हे हायटेक केंद्र सुरू करण्यात येत आहे.
या भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन धुराटकर परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे. आयोजकांमध्ये श्री. प्रवीण हंसराज धुराटकर, सौ. भारती धुराटकर, श्री. आकाश धुराटकर, सौ. पायल धुराटकर, कु. आकांक्षा धुराटकर आणि मास्टर आदिक्ष धुराटकर यांचा समावेश आहे.
या अत्याधुनिक वस्त्र धुलाई केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यास सर्व मान्यवर, मित्रपरिवार, हितचिंतक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आग्रही आवाहन धुराटकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
