पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे योगदान मोलाचे; आरपीआय (आठवले) ख्रिश्चन सेलकडून विशेष सन्मान
पुणे/पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ३० जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे : पुणे शहरात अत्यंत शिस्तबद्ध पोलीस व्यवस्था निर्माण करणे, अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) विळख्याविरोधात प्रभावी मोहीम राबवून ड्रग्ज माफियांवर कठोर नियंत्रण आणणे तसेच गुन्हेगारीवर वचक ठेवून सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केल्याबद्दल पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ख्रिश्चन सेल, पुणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा भव्य कृतज्ञता सोहळा पार पडला.
यावेळी ख्रिश्चन सेलचे पुणे शहराध्यक्ष ख्रिस्तोफर जे. राजमनी यांच्या हस्ते पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना विशेष गौरवचिन्ह आणि शाल प्रदान करून सन्मानित करण्यात आले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या धडाकेबाज नेतृत्वाचे कौतुक करताना ख्रिस्तोफर जे. राजमनी म्हणाले की, “त्यांच्या कार्यकाळात पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम झाली आहे. शहरात शिस्त आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी आयुक्तांनी घेतलेले निर्णय अत्यंत कौतुकास्पद असून, त्यांच्या याच जनहितार्थ कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ख्रिश्चन सेलच्या वतीने हा सन्मान करण्यात आला आहे.”

या प्रसंगी माजी नगरसेविका हिमाली कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ख्रिश्चन सेलच्या महिला पुणे शहराध्यक्षा डॉर्थी आर. थॉमस, येशू डोरेस्वामी, स्टॅन्डली नाथन, कॉलिग वॉश, अरुण पवार, दिव्या संतालिय आणि जॉन मुनवर सिंग आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळ्याला उपस्थित सर्वच मान्यवरांनी पोलीस आयुक्तांच्या गतिमान आणि पारदर्शक कार्यपद्धतीची प्रशंसा केली, तसेच भविष्यातही पुणेकरांच्या सुरक्षेसाठी त्यांचे हे प्रभावी व धडक नेतृत्व असेच कायम राहावे, अशी सदिच्छा व्यक्त केली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
