news
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला पिंपरी-चिंचवडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारो कामगार, महिला व युवकांचा भव्य सहभाग‘यशस्वी’ संस्थेत ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; ‘यशोगाथा’ विशेषांकाचे भव्य प्रकाशनपिंपरी-चिंचवड महापालिका ‘ह’ प्रभाग अध्यक्षा नगरसेविका तृप्तीताई कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण व १०० राष्ट्रध्वजांचे वितरणरहाटणीत देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमला; महापालिका ‘ड’ प्रभाग सभापती सविताताई खुळे यांच्या हस्ते ध्वजवंदनपिंपरी वाघेरे येथील कन्या विद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
Home पिंपरी चिंचवड महाराष्ट्राचे भाग्यविधाते कै. वसंतराव नाईक यांना पिंपरी-चिंचवड मनपाकडून आदरपूर्वक अभिवादन!

महाराष्ट्राचे भाग्यविधाते कै. वसंतराव नाईक यांना पिंपरी-चिंचवड मनपाकडून आदरपूर्वक अभिवादन!

महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते मुख्य भवनात प्रतिमा पूजन; अकरा वर्षांच्या प्रदीर्घ व लोककल्याणकारी कार्यकाळाच्या स्मृतींना उपमहापौर शर्मिला बाबर व अतिरिक्त अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिली उजाळा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जयंतीनिमित्त अभिवादन; दूरदृष्टी असणारे मुत्सद्दी राजकारणी: महापौर रवि लांडगे

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, १ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

  पिंपरी चिंचवड: “महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी सलग अकरा वर्षे विराजमान होण्याचा बहुमान मिळविणारे तसेच राज्यातील हरित क्रांतीचे जनक म्हणून सर्वदूर ओळख असणारे दिवंगत वसंतराव नाईक हे दूरदृष्टी असणारे एक मुत्सद्दी राजकारणी होते,” असे गौरवोद्गार पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवी लांडगे यांनी काढले.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली, त्याप्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, उप आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते सिताराम राठोड, संदीप पवार, रघुनाथ चव्हाण, नितीन चव्हाण, गीता चव्हाण, रवी राठोड, रावसाहेब राठोड, अविनाश राठोड, नामदेव चव्हाण, प्रेम पवार, अर्जुन राठोड, शुभम खैरनार, आकाश चव्हाण, माया वाकडे, रमेश राठोड, बालाजी राठोड, अविनाश जाधव, प्रकाश डोंगरे, विजय राठोड, विनायक चव्हाण, अविनाश चव्हाण, सचिन चव्हाण, सचिन जाधव तसेच महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आणि कर्मचाऱ्यांनी दिवंगत वसंतराव नाईक यांच्या ऐतिहासिक कार्याचे स्मरण करत त्यांना अभिवादन केले. वसंतराव नाईक यांचे शेती, जलसंधारण आणि ग्रामीण विकासातील योगदान अद्वितीय असून, त्यांचा विकासाभिमुख तसेच लोककल्याणकारी विचारांचा आदर्श समाजाने निरंतर जपला पाहिजे, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!