news
पिंपरी-चिंचवड मनपा शाळांचा कायापालट; कासारवाडीत राजर्षी शाहू महाराज शाळेच्या हायटेक इमारतीचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण!NEET, TET आणि पुणे मनपा भरती पेपरफुटीवरून पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेस आक्रमक; हनुमंत पवार आणि नरेंद्र बनसोडे यांचा सरकारवर हल्लाबोल!पिंपरी-चिंचवडमध्ये पालखी स्वागतासाठी मनपा सज्ज; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला तयारीचा ऑन-द-स्पॉट आढावा!आकुर्डीत महावितरणविरोधात असंतोषाचा भडका; प्रीपेड स्मार्ट मीटर विरोधात शिवनेरी सोसायटीचे रहिवासी आक्रमक!मनपा अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गणेश अवघडे; कष्टकरी संघर्ष महासंघाकडून भव्य सत्कार!
Home पिंपरी चिंचवड पिंपरी मतदारसंघात निवडणूक आयोगाची मोठी मोहीम; ४ लाख मतदारांच्या अचूकतेसाठी ३९८ बीएलओ मैदानात!

पिंपरी मतदारसंघात निवडणूक आयोगाची मोठी मोहीम; ४ लाख मतदारांच्या अचूकतेसाठी ३९८ बीएलओ मैदानात!

५१% मतदारांचे मॅपिंग पूर्ण, ३० जुलैपर्यंत चालणार प्रत्यक्ष गृहभेट; अप्पर तहसीलदार जयराज देशमुख व अर्चना यादव यांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

२०६ पिंपरी विधानसभा मतदारसंघात ‘विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहीम’ सुरू; मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ३९८ बीएलओ करणार गृहभेट

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ३० जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघात मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी ‘विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रम’ सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी आवश्यक असलेले अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षण, गणना प्रपत्र (EF) छपाई आणि बीएलओ (BLO) यांना प्रपत्रांचे वाटप करण्याचे कामकाज २९ जून रोजीच पूर्ण झाले असून, प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाला (Ground Work) उत्साहात सुरुवात झाली आहे.

या मोहिमेला गती देण्यासाठी राष्ट्रीय व राज्य स्तरीय राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक घेऊन त्यांना मोहिमेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर ‘बीएलए-२’ (BLA-2) यांची नियुक्ती करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कालावधी / तारीख राबविण्यात येणारा उपक्रम
३० जून ते २९ जुलै २०२६ बीएलओ (BLO) मार्फत घराघरांमध्ये जाऊन ‘EF फॉर्म’ चे वाटप व स्वीकृती करणे.
०५ ऑगस्ट २०२६ प्रारूप मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध करणे.
०५ ऑगस्ट ते ०४ सप्टेंबर २०२६ प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीवर नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारणे.
०५ ऑगस्ट ते ०३ ऑक्टोबर २०२६ प्राप्त दावे व हरकतींवर रीतसर नोटीस बजावणे आणि सुनावणी घेणे.
०७ ऑक्टोबर २०२६ अंतिम आणि अचूक मतदार यादीची अधिकृत प्रसिद्धी.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात एकूण ३९८ मतदान केंद्र असून, एकूण ४,०१,९७५ मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या २,०८,६५३, स्त्री मतदारांची संख्या ९,९३,२८३ तर इतर मतदारांची संख्या ३९ इतकी आहे. दिनांक २९ जून २०२६ पर्यंत तब्बल २,०४,२९३ (५१%) मतदारांचे सन २००२ च्या मतदार यादीसोबत मॅपिंग/प्रोजेनीचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. यासाठी मतदारांच्या प्रत्यक्ष गृहभेटी घेणे, मतदारसंघातील विविध ७५ महत्त्वाच्या ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करणे आणि निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून शोध घेणे यांसारख्या विविध मार्गांचा अवलंब करण्यात आला आहे. उर्वरित मतदारांची प्रक्रिया या विशेष मोहिमेदरम्यान वेगाने पूर्ण केली जाणार आहे.

मतदारसंघातील काम सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने मोठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO): २३, बूथ लेव्हल ऑफिसर (BLO): ३९८, नोडल अधिकारी व इतर कर्मचारी: ४० नोडल अधिकारी, प्रगणक, ग्राम महसूल अधिकारी आणि सेक्टर अधिकारी, पर्यवेक्षक (Supervisors): १०. याशिवाय, ‘EF फॉर्म’ वाटप करण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था (NGOs) आणि महिला बचत गटांची मोठी मदत घेतली जात आहे. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा प्रशासनामार्फत विविध माध्यमांद्वारे या मोहिमेला व्यापक प्रसिद्धी दिली जात आहे. या संपूर्ण मोहिमेचे थेट संनियंत्रण अप्पर तहसीलदार श्री. जयराज देशमुख आणि निवडणूक नायब तहसीलदार श्री. अभिजीत केंद्रेकर हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) म्हणून करत आहेत.

“लोकशाही प्रक्रिया अधिक सक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी मतदार यादी अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. पिंपरी मतदारसंघातील सर्व सुज्ञ नागरिकांनी आपल्या कुटुंबातील पात्र मतदारांची नोंदणी व माहिती अद्ययावत असल्याची खात्री करावी. आपल्या घरी येणाऱ्या बीएलओ (BLO) कर्मचाऱ्यांना आवश्यक ती योग्य माहिती व कागदपत्रे देऊन सहकार्य करावे.”

– श्रीमती अर्चना यादव, मतदार नोंदणी अधिकारी, २०६ पिंपरी (अजा)

नागरिक आपल्या मोबाईलमध्ये ECINET ॲप डाउनलोड करून संबंधित बीएलओ कर्मचाऱ्यांशी थेट संपर्क साधू शकतात. तसेच मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in आणि https://voters.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळांना भेट देऊ शकतात.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!