news
अमरावती समाज कल्याण विभागाचा पुढाकार; ‘स्माईल’ योजनेद्वारे तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणणारचित्रपट आणि नाट्य क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी! अमरावतीत ‘बिइंग आर्टिस्ट अकॅडमी’तर्फे मोफत कार्यशाळातुकोबांच्या पालखी सोहळ्यात ‘मविप्र’ आणि मनपाचा अनोखा उपक्रम; ‘साक्षरतेची वारी’ चित्ररथाचे वसंतदादा पाटील विद्यामंदिरात थाटात उद्घाटनअयोध्येच्या राम मंदिर ट्रस्टमध्ये कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार; सरचिटणीस चंपत राय यांची हकालपट्टीरहाटणीत पवना नदीने ओलांडली धोक्याची पातळी; स्थायी समिती सदस्य बाबासाहेब त्रिभुवन यांच्याकडून पूरग्रस्तांना मोठा दिलासा
Home अमरावती चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी! अमरावतीत ‘बिइंग आर्टिस्ट अकॅडमी’तर्फे मोफत कार्यशाळा

चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी! अमरावतीत ‘बिइंग आर्टिस्ट अकॅडमी’तर्फे मोफत कार्यशाळा

शॉर्ट फिल्म्सचे प्रदर्शन व तज्ज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन; इच्छुकांना १० जुलै २०२६ पूर्वी नाव नोंदणी करण्याचे संचालिका स्नेहा वासनिक यांचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

“सिनेमा सिनेमा खेळताना” एकदिवसीय निःशुल्क चित्रपट कार्यशाळेचे आयोजन; बिइंग आर्टिस्ट अकॅडमी ऑफ फिल्म अँड थिएटर आर्टस् चा कौतुकास्पद उपक्रम

अमरावती,अविनाश वानखेडे ८ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज  :

अमरावती: चित्रपट, नाटक, वेब सिरीज आणि न्यूज चॅनेल यांसारख्या ग्लॅमरस व अथांग माध्यमांमध्ये रोजगार, व्यवसाय आणि नोकरीच्या सुवर्णसंधी शोधणाऱ्या नवोदित कलाकारांसह विद्यार्थ्यांना चित्रपट उद्योगाची तांत्रिक ओळख आणि निर्मितीचे पायाभूत प्रशिक्षण देण्यासाठी अमरावतीत एका महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘अमरावती स्पंदन परिवार बहुउद्देशीय संस्था’ संचलित ‘बिइंग आर्टिस्ट अकॅडमी ऑफ फिल्म अँड थिएटर आर्टस्’ च्या वतीने “सिनेमा सिनेमा खेळताना” या एकदिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन रविवारी, १२ जुलै २०२६ रोजी करण्यात आले आहे. या पूर्णपणे निःशुल्क (Free) कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी १० जुलै २०२६ पर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन अकॅडमीच्या संचालिका स्नेहा वासनिक यांनी केले आहे.

चित्रपट आणि इतर दृकश्राव्य माध्यमांचे रीतसर शिक्षण घेतल्यानंतर शासकीय संस्था, अशासकीय संस्था, सरकारी कार्यालये, आणि खासगी कंपन्यांमध्ये करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध असतात, यावर या कार्यशाळेत प्रकाश टाकला जाईल. याशिवाय राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील फेलोशीप्स, स्कॉलरशिप, चित्रपट निर्मितीसाठी मिळणारे शासकीय अर्थसाहाय्य आणि चित्रपट उद्योजकता (Film Entrepreneurship) याविषयी कलाकारांमध्ये जनजागृती करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे.

कार्यशाळेदरम्यान चित्रपट निर्मितीची नेमकी प्रक्रिया काय असते? तसेच चित्रपट क्षेत्रातील विविध महत्त्वाचे विभाग जसे की निर्माता (Producer) व आर्थिक गुंतवणूक आणि मोबदला, कथा लेखन (Script Writing) व दिग्दर्शन (Direction), अभिनय (Acting) आणि छायाचित्रण (Cinematography), प्रकाश योजना (Lighting) व संकलन (Editing), ध्वनी (Sound Design) आणि कला दिग्दर्शन (Art Direction), रंगभूषा (Makeup), वेशभूषा (Costume Design), जाहिरात व प्रसिद्धी (Marketing & PR), सेन्सॉर सर्टिफिकेशन (Censor Certification) आणि वितरण व्यवस्था (Distribution) या सर्व विभागांची तांत्रिक कार्यपद्धती नेमकी कशी चालते, यावर तज्ज्ञांद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. “सिनेमा किंवा चित्रपट म्हणजे नेमके काय? आणि कला-व्यवसाय-उद्योग-करिअर म्हणून या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा?” यावर अभ्यासपूर्ण चर्चात्मक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

केवळ व्याख्याने न घेता, या कार्यशाळेत काही निवडक दर्जेदार लघुपटांचे (Short Films) खास प्रदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर त्या लघुपटांवर विश्लेषणात्मक व निरीक्षणात्मक चर्चा केली जाईल, तसेच प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आणि कलाकारांच्या शंकांचे निरसन केले जाईल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पंकज धंदर यांनी दिली आहे.

ही कार्यशाळा सर्वांसाठी पूर्णपणे मोफत असून, मर्यादित जागांमुळे पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी १० जुलै २०२६ पूर्वी क्रमांकांवर संपर्क साधून आपले नाव निश्चित करावे  ९३२४३६३६००,  ९५१८३८११३२ .आपल्यातील सुप्त कलाकाराला तांत्रिक दिशा देण्याची ही सुवर्णसंधी असून अमरावती व परिसरातील कलाप्रेमी व विद्यार्थ्यांनी याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन अकॅडमीतर्फे करण्यात आले आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!