news
दिल्ली मतदार यादी पुनरीक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात; बाधित मतदारांची नावे आणि कारणे सार्वजनिक करण्याचे आवाहन!‘नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध’; स्थायी समिती बैठकीत सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन!‘शिक्षकांमुळेच महापालिका शाळांकडे पालकांचा कल वाढला’; प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान!‘शहराच्या नियोजनबद्ध विकासात पालिकेच्या अभियंत्यांचे योगदान अद्वितीय’; महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!‘अभिजात मराठी भाषा सप्ताह ही लोकचळवळ व्हावी’; पिंपरी महापालिकेच्या नियोजन बैठकीत महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!
Home अमरावती फुले दाम्पत्याचा वैचारिक वारसा तरुण पिढीपर्यंत पोहोचवणार! सावित्री शक्तीपीठाचे राज्यव्यापी अभियान सुरू

फुले दाम्पत्याचा वैचारिक वारसा तरुण पिढीपर्यंत पोहोचवणार! सावित्री शक्तीपीठाचे राज्यव्यापी अभियान सुरू

खासदार डॉ. अमोल कोल्हे निर्मित 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा परतवाड्यात प्रचार; शीला चर्जन व अभिनेत्री अपूर्वा सोनार यांच्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

“सावित्रीबाई जोतीराव फुले” महामालिकेचा राज्यव्यापी प्रचार-प्रसार अभियान परतवाड्यातून सुरू! सावित्री शक्तीपीठाच्या शीला चर्जन व अभिनेत्री अपूर्वा सोनार यांच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

अमरावती/परतवाडा, प्रतिनिधी जयकुमार चर्जन (विशेष वृत्त )१० जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती/परतवाडा: भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक, पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीआई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या अभूतपूर्व सामाजिक सुधारणा, शैक्षणिक क्रांती आणि जीवन संघर्षावर आधारित “सावित्रीबाई जोतीराव फुले” या महामालिकेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ‘सावित्री शक्तीपीठ, पुणे’ या संस्थेच्या वतीने राज्यभर एक विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे. जगदंब क्रिएशनचे निर्माते, सुप्रसिद्ध अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे निर्मित ही महामालिका आता लोकआग्रहास्तव ‘मराठी वारसा’ या युट्युब चॅनेलवर दर सोमवार, बुधवार आणि शनिवार रोजी संध्याकाळी ठीक ६:३० वाजता प्रसारित केली जात आहे.

फुले दाम्पत्याचा हा दैदिप्यमान इतिहास, शैक्षणिक आणि सामाजिक कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत व विशेषतः आजच्या नवपिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सावित्री शक्तीपीठाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ. शीला चर्जन आणि राज्याध्यक्षा तथा प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा सोनार यांनी राज्यव्यापी अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा भाग म्हणून परतवाडा शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या ‘सिद्धार्थ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात’ थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधून या मालिकेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या कौतुकास्पद आणि प्रेरणादायी उपक्रमाचे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात आणि सामाजिक वर्तुळातून प्रचंड कौतुक केले जात आहे.

अभियानाचा मुख्य उद्देश तरुण पिढीला संतांच्या आणि समाजसुधारकांच्या विचारांशी जोडणे हा आहे. शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये जाऊन ही मोहीम राबवली जात आहे. परतवाडा येथील कार्यक्रमात सिद्धार्थ विद्यालयाचे प्राचार्य दिनेश मोहोड यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून या उपक्रमाचे स्वागत केले.

त्यानंतर, सत्यशोधक जयकुमार चर्जन, सावित्री शक्तीपीठाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शीला चर्जन आणि राज्याध्यक्षा अभिनेत्री अपूर्वा सोनार यांनी विद्यार्थ्यांना ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ महामालिका आणि ‘मराठी वारसा’ या डिजिटल मंचाची सविस्तर माहिती दिली.

“आज आपण ज्या मोकळ्या वातावरणात आणि अधिकाराने शिक्षण घेत आहोत, त्याचे संपूर्ण श्रेय फुले दाम्पत्याच्या संघर्षाला जाते. हा संघर्ष, त्यांचे त्याग आणि इतिहास प्रत्येक विद्यार्थ्याने आवर्जून पाहिला पाहिजे,” असे आवाहन राष्ट्रीय उपाध्यक्षा शीला चर्जन आणि अभिनेत्री अपूर्वा सोनार यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडले. त्यांच्या या वक्तव्याने आणि मार्गदर्शनाने विद्यार्थी कमालीचे प्रभावित झाले.

सावित्री शक्तीपीठाच्या माध्यमातून महिलांना आणि युवा पिढीला वैचारिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी शीला चर्जनअपूर्वा सोनार यांनी घेतलेले हे परिश्रम कौतुकास्पद ठरत आहेत. इतिहासाचे जतन केवळ पुस्तकात न ठेवता ते डिजिटल माध्यमाद्वारे घराघरांपर्यंत पोहोचवण्याच्या त्यांच्या या दूरदृष्टीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

याप्रसंगी व्यासपीठावर सावित्री शक्तीपीठाच्या परतवाडा शहराध्यक्षा अनुराधा भुस्कट, वृंदा तडस, चित्रा रसे, रोशन तडस, महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश मोहोड यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सावित्री शक्तीपीठाच्या या राज्यव्यापी अभियानाला पहिल्याच टप्प्यात परतवाडा शहरात उदंड प्रतिसाद मिळाला असून, आगामी काळात हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणाईसाठी दिशादर्शक ठरणार आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!