news
मोशी दुर्घटनेप्रकरणी ‘अँटोनी लारा’ कंपनी आणि पर्यावरण विभागाला कारणे दाखवा नोटीस; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे कडक निर्देशपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कंत्राटी पद्धतीवर राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे यशवंतभाऊ भोसले कडाडले; मोशी दुर्घटनेवरून आंदोलनाचा इशारापुण्यात १८ जुलै रोजी इस्कॉन (ISKCON) बीसीईसी तर्फे भव्य ‘भगवान जगन्नाथ रथयात्रा’ सोहळा; बानेरमध्ये पहिल्यांदाच अवतरणार ‘पुरी’ची दिव्य परंपरामोशी येथील गुरुकुलम् व चाफेकर विद्यामंदिराच्या नुकसानीची महापौर रवि लांडगे यांच्याकडून ‘ऑन द स्पॉट’ पाहणीखडकी आणि कॅम्प परिसरात आरपीआय (ए) ख्रिश्चन सेलचा वारकऱ्यांसाठी अनोखा सेवायज्ञ; डॉर्थी आर. थॉमस आणि क्रिस्टोफर राजमणी यांच्याकडून अहोरात्र मदतकार्य
Home पुणे खडकी आणि कॅम्प परिसरात आरपीआय (ए) ख्रिश्चन सेलचा वारकऱ्यांसाठी अनोखा सेवायज्ञ; डॉर्थी आर. थॉमस आणि क्रिस्टोफर राजमणी यांच्याकडून अहोरात्र मदतकार्य

खडकी आणि कॅम्प परिसरात आरपीआय (ए) ख्रिश्चन सेलचा वारकऱ्यांसाठी अनोखा सेवायज्ञ; डॉर्थी आर. थॉमस आणि क्रिस्टोफर राजमणी यांच्याकडून अहोरात्र मदतकार्य

वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे व कॉर्पोरेटर निलेश आल्हाट यांच्याकडून ख्रिश्चन महिला व पुरुष सेलच्या मानवतावादी कार्याचा गौरव | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

वारीतील माणुसकीचे दर्शन! आरपीआय (ए) ख्रिश्चन सेलचा वारकऱ्यांसाठी अनोखा सेवाभाव; मोफत वैद्यकीय शिबिर, पादत्राणांमुळे झालेल्या जखमांवर उपचार व फराळ वाटप

पुणे, /पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, १२ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

आषाढी वारीनिमित्त भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेल्या संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांच्या सेवेसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) ख्रिश्चन सेल, पुणे शहराच्या वतीने अत्यंत स्तुत्य आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. वारीच्या पवित्र मार्गावर खडकी रेल्वे स्थानकासमोर तसेच कॅम्प येथील पुलगेट परिसरात भव्य मोफत वैद्यकीय शिबिर, थकलेल्या पायांसाठी विशेष मसाज सेवा, पायाला झालेल्या चिखली व जखमांवर उपचार, मोफत औषधोपचार आणि पौष्टिक फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.

हा संपूर्ण उपक्रम आरपीआय (ए) ख्रिश्चन महिला सेलच्या अध्यक्षा डॉर्थी आर. थॉमस आणि पुणे शहराध्यक्ष क्रिस्टोफर जे. राजमणी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडला. वारीदरम्यान शेकडो किलोमीटर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना होणारा शारीरिक त्रास कमी व्हावा आणि त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेता यावी, या पवित्र उद्देशाने या सेवायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.

सततच्या चालण्यामुळे आणि पावसामुळे अनेक वारकऱ्यांच्या पायाला चिखली होणे, पायाला फोड येणे अशा त्रासाला सामोरे जावे लागते. हे ओळखून या शिबिरामध्ये वारकऱ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी करून आवश्यक त्या सर्व औषधांचे तात्काळ वाटप करण्यात आले.

थकलेल्या माऊलींच्या पायांसाठी विशेष मसाज सेवा देण्यात आली. तसेच वेदनाशामक औषधे, मलम, विशेष क्रीम्स, डोळ्यांच्या त्रासासाठी आय ड्रॉप्स, आणि पायांच्या जखमांवर तातडीने ड्रेसिंग व बँडेजची अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यासोबतच वारकऱ्यांची ऊर्जा टिकून राहावी म्हणून गुडदाणी आणि राजगिरा लाडू यांसारख्या पौष्टिक फराळाचेही मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले.

ख्रिश्चन सेलच्या या आगळ्यावेगळ्या मानवतावादी उपक्रमाला कॉर्पोरेटर निलेश आल्हाट, लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे तसेच पोलीस शिपाई शैलेश जगताप यांनी प्रत्यक्ष भेट दिली. वारीतील या खऱ्या सेवाभावाचे आणि शिस्तबद्ध आयोजनाचे सर्वच मान्यवरांनी मनापासून कौतुक केले.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ख्रिश्चन सेलचे प्रमुख कार्यकर्ते राजा मोझेस, डॅनियल मुदलियार, एस. डी. पिल्ले, सेल्वाराज पिल्ले, सेबॅस्टियन, व्हिक्टर, सायमन दोरास्वामी, स्टॅन्ली नाथन, अरुण पवार, रॉकी अँथनी, जॉन सिंग, सायरिल मरीन, सालोमन ब्रो, विजय, लिझन बर्वे, रिचर्ड ब्रो यांच्यासह महिला सेलच्या सुझान लाजरस, लुसी जोसेफ, अग्नेस, अँजेला पिल्ले, ग्लोरिया अँथनी, दिलराज पिल्ले, पॉल नायर, मेरी रोझी इग्नेशियस, हेमा हिरनवार, जलिन योगेश पिल्ले आणि इतर शेकडो कार्यकर्त्यांनी अहोरात्र सक्रिय सहभाग नोंदवला.

जात, धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन केवळ मानवता आणि वारकरी परंपरेप्रती आदर व्यक्त करणारा हा उपक्रम वारीच्या इतिहासातील सेवाभावाचे एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श उदाहरण ठरला असून, लाभधारक वारकऱ्यांनी आयोजकांना मनोभावे आशीर्वाद देऊन आभार मानले.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!