news
शासनमान्य ग्रंथालयांना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानकडून अर्थसहाय्याची संधी; २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहनस्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ‘अजातशत्रू – अजितदादा’ पुस्तक मुखपृष्ठ अनावरण सोहळा संपन्नपिंपरी-चिंचवड महापालिकेचा अनधिकृत होर्डिंग्सविरोधात ॲक्शन मोड; आकाशचिन्ह व परवाना विभागाचा थेट हातोडामोशी हत्याकांडावरून पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वपक्षीय एल्गार; पोलीस आयुक्तांना दिले तीव्र निदर्शनांचे निवेदनसांगवीत भाजप युवा सेना नेते जवाहरशेठ ढोरे यांचा नागरी सत्कार उत्साहात; सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांच्या हिताचा संकल्प
Home पिंपरी चिंचवड सांगवीत भाजप युवा सेना नेते जवाहरशेठ ढोरे यांचा नागरी सत्कार उत्साहात; सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांच्या हिताचा संकल्प

सांगवीत भाजप युवा सेना नेते जवाहरशेठ ढोरे यांचा नागरी सत्कार उत्साहात; सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांच्या हिताचा संकल्प

ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज व सांगवी विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

गणेश सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल जवाहरशेठ ढोरे यांचा ‘सांगवी विकास मंच’तर्फे भव्य नागरी सत्कार!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २१ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरात आपल्या सामाजिक व संघटन कौशल्याने वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पक्ष (भाजप) युवा सेनेच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य श्री. जवाहरशेठ ढोरे यांची नुकतीच सांगवी-पिंपळे गुरव पंचक्रोशीत अत्यंत नावाजलेल्या ‘गणेश सहकारी बँके’च्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय आणि बिनविरोध यशाबद्दल ‘सांगवी विकास मंच’च्या वतीने त्यांचा नुकताच विशेष नागरी सत्कार करून पुढील यशस्वी वाटचालीस उदंड शुभेच्छा देण्यात आल्या.

जवाहरशेठ ढोरे यांनी आजवर सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरातील नागरी प्रश्न सोडवणे, तरुणांचे संघटन करणे आणि विविध सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रगण्य भूमिका बजावली आहे. त्यांची गणेश सहकारी बँकेच्या संचालकपदी झालेली बिनविरोध निवड ही त्यांच्या आजवरच्या निस्वार्थी सामाजिक कार्याची, जनसंपर्काची आणि लोकसेवेचीच पोचपावती मानली जात आहे.

या सत्काराला उत्तर देताना श्री. जवाहरशेठ ढोरे यांनी सांगवी विकास मंचचे आणि उपस्थित सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले. बँकेच्या संचालकपदाच्या माध्यमातून परिसरातील सर्वसामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक, व्यापारी आणि सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी व बँकेच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत पारदर्शक आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सांगवी विकास मंचच्या वतीने आयोजित या सत्कार समारंभास सांगवी-पिंपळे गुरव परिसरातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांतील प्रमुख मान्यवरांनी उपस्थित राहून जवाहरशेठ ढोरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

उपस्थित मान्यवर श्री. पवार सर (सांगवी विकास मंच), श्री. मुरलीधरपंत दळवी, श्री. दिलीपकुमार फाकटकर (सुवर्णकार समाजाचे ज्येष्ठ नेते), श्री. बाळकृष्ण गिरगुणे (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते), श्री. नारायण भागवत, ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज (ज्येष्ठ प्रवचनकार), श्री. जवाहरशेठ ढोरे (सत्कारमूर्ती). श्री. महेशशेठ भागवत, श्री. भरतशेठ कुंभार यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी जवाहरशेठ ढोरे यांच्या नेतृत्वगुणांचे व कार्यशैलीचे भरभरून कौतुक केले. ढोरे यांच्या अभ्यासू आणि कार्यतत्पर नेतृत्वामुळे गणेश सहकारी बँकेच्या प्रगतीचा आलेख अधिक उंचावेल आणि सांगवी-पिंपळे गुरव परिसराच्या सहकार क्षेत्राला नवी ऊर्जा मिळेल, असा दृढ विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!