news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत विविध नागरी सुविधांच्या प्रस्तावांना हिरवा कंदील

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत विविध नागरी सुविधांच्या प्रस्तावांना हिरवा कंदील

दिवंगत अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त सर्वपक्षीय आदरांजली; सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून महसूलवाढीवर भर | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या स्थायी समिती सभेत विकासकामांचा धडाका! उड्डाणपुलांवरील जाहिरातींच्या ई-लिलावातून महसूलवाढ, आरोग्य अन् पायाभूत सुविधांच्या विविध प्रस्तावांना मंजुरी

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, २२ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची अत्यंत महत्त्वाची सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत शहरातील महसूलवाढीस मोठी चालना देणारे धोरणात्मक निर्णय, पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, पर्यावरण, शिक्षण आणि समाजकल्याण विभागाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

सभेच्या सुरुवातीला पिंपरी-चिंचवडच्या जडणघडणीत मोठे योगदान देणारे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त सर्वपक्षीय सदस्यांच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

स्थायी समितीने महापालिकेचे कायमस्वरूपी महसूल स्रोत वाढवण्यासाठी मोठे निर्णय घेतले आहेत. शहरातील ८० उड्डाणपूल व भुयारी मार्गांवरील जाहिरात हक्क १० वर्षांच्या कालावधीसाठी ई-लिलावाद्वारे देण्यास मंजुरी. यामुळे ग्राहक किंमत निर्देशांकानुसार (CPI) दरवर्षी महसुलात वाढ होईल.  १८ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवरील दिशादर्शक फलकांवरील जाहिरात हक्क ५ वर्षांसाठी देण्यास मान्यता.

वायसीएम (YCM) रुग्णालयातील शवागारातील कोल्ड स्टोरेजच्या वार्षिक देखभालीची (AMC) दुरुस्ती मंजूर.  पालिकेच्या विविध रुग्णालयांत रुग्णवाहिका व वैद्यकीय कामकाज सुरळीत चालण्यासाठी कंत्राटी पद्धतीने ३७ वाहनचालक उपलब्ध करण्यास मंजुरी. एचआयव्ही/एड्स बाधित नागरिकांसाठी पीएमपीएमएल (PMPML) मोफत बस पास योजनेसाठी आवश्यक निधीस मंजुरी.

संभाजीनगर (प्रभाग १०) येथे स्टॉर्म वॉटर लाईन, अर्बन स्ट्रीट डिझाईन पदपथांची दुरुस्ती आणि चिंचवड (प्रभाग १८) मधील मिसिंग लिंक रस्ते विकसित करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नियुक्तीस मंजुरी. चऱ्होली येथील मैलाशुद्धीकरण केंद्र (STP) देखभाल-दुरुस्ती, तसेच खासगी गृहनिर्माण संस्थांमधील सांडपाण्याच्या पुनर्वापराबाबतच्या धोरणात्मक प्रस्तावाला मान्यता.पारंपरिक रिक्षांचे ई-रिक्षामध्ये रूपांतर करणाऱ्या चालकांना आर्थिक सहाय्य देण्याचा प्रस्ताव मुख्य सभेकडे शिफारस करण्यात आला. अग्निशामक दलासाठी ‘स्मार्ट गार्ड कटर’ उपकरण खरेदी, बीआरटी थांब्यांची दुरुस्ती आणि दापोडी येथे नवीन तलाठी कार्यालयासाठी पालिकेची जागा भाडेतत्त्वावर देण्याची शिफारस.

“महसूलवाढीला चालना देणारे, आरोग्य सेवा बळकट करणारे आणि पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणारे महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आले आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी स्थायी समिती कटिबद्ध आहे.”

— अभिषेक बारणे (सभापती, स्थायी समिती)

सभेत दिवंगत अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना सभापती बारणे यांच्यासह समिती सदस्य विकास साने, बाबासाहेब त्रिभुवन, सुलभा उबाळे आणि शालिनीताई गुजर यांनी दादांच्या शहरासाठीच्या योगदानाचे स्मरण केले.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!