news
दिल्ली मतदार यादी पुनरीक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात; बाधित मतदारांची नावे आणि कारणे सार्वजनिक करण्याचे आवाहन!‘नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध’; स्थायी समिती बैठकीत सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन!‘शिक्षकांमुळेच महापालिका शाळांकडे पालकांचा कल वाढला’; प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान!‘शहराच्या नियोजनबद्ध विकासात पालिकेच्या अभियंत्यांचे योगदान अद्वितीय’; महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!‘अभिजात मराठी भाषा सप्ताह ही लोकचळवळ व्हावी’; पिंपरी महापालिकेच्या नियोजन बैठकीत महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!
Home पिंपरी चिंचवड पावसाळ्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासन अलर्ट मोडवर; आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

पावसाळ्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासन अलर्ट मोडवर; आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांचे निर्देश; सखल भागांची पाहणी, आरोग्य पथके अन् यंत्रसामग्री सज्ज | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आपत्ती व्यवस्थापनात समन्वय, तत्परता आणि पूर्वतयारीला प्राधान्य द्या – अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २२ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात निर्माण होणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत विशेष आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक पार पडली. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सर्व विभागांनी अत्यंत समन्वयाने व तत्परतेने कार्य करावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.

बैठकीत मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम म्हणाले की, पूर्वतयारी, प्रभावी समन्वय आणि तातडीचा प्रतिसाद ही यशस्वी आपत्ती व्यवस्थापनाची प्रमुख सूत्रे आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) २४ तास कार्यरत ठेवावी. कोणतीही दुर्घटना किंवा माहिती मिळताच या पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू करावे. सखल भागांची पाहणी व निवारा केंद्रे: पूरपरिस्थितीची शक्यता लक्षात घेऊन शहरातील सखल भागांची नियमित पाहणी करावी व नागरिकांना आधीच सतर्क करावे. तसेच शाळा किंवा सार्वजनिक इमारतींमध्ये निवारा केंद्रे उभारून तेथे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वीज आणि मूलभूत सुविधांची खात्री करावी.

 क्षेत्रनिहाय स्वतंत्र वैद्यकीय पथके स्थापन करून पुरेसा औषधसाठा, वैद्यकीय साहित्य व रुग्णवाहिका कायम सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या भागांत पाणी साचते, तेथे पाण्याचा तात्काळ उपसा करण्यासाठी उच्च क्षमतेचे पंप तैनात ठेवावेत. धोकादायक परिस्थिती उद्भवल्यास स्थापत्य विभागाने जेसीबी व आवश्यक यंत्रसामग्री तयार ठेवावी. आपत्ती व्यवस्थापनात ‘आपदा मित्र’ स्वयंसेवक पथकाशी सतत समन्वय ठेवून त्यांचा प्रभावी सहभाग सुनिश्चित केला जावा.

या बैठकीस मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंते अजय सूर्यवंशीअनिल भालसाखळे, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, अण्णा बोदडे, व्यंकटेश दुर्वास, सीताराम बहुरे, राजेश आंगळे, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, निवेदिता घार्गे, परशुराम वाघमोडे, अजिंक्य येळे, पूजा दुधनाळे, गोरख लिमन, मुकेश कोळप, सहाय्यक आयुक्त उमा दर्वेश, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, अमित पंडित, मुख्य पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरुण दगडे, डॉ. अंजली नलावडे यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!