news
दिल्ली मतदार यादी पुनरीक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात; बाधित मतदारांची नावे आणि कारणे सार्वजनिक करण्याचे आवाहन!‘नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध’; स्थायी समिती बैठकीत सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन!‘शिक्षकांमुळेच महापालिका शाळांकडे पालकांचा कल वाढला’; प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान!‘शहराच्या नियोजनबद्ध विकासात पालिकेच्या अभियंत्यांचे योगदान अद्वितीय’; महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!‘अभिजात मराठी भाषा सप्ताह ही लोकचळवळ व्हावी’; पिंपरी महापालिकेच्या नियोजन बैठकीत महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!
Home पिंपरी चिंचवड मोरे वस्तीत पिंपरी-चिंचवड महापालिकेची धडक कारवाई; नाल्यावरील अतिक्रमण हटवून पाण्याचा प्रवाह केला मोकळा

मोरे वस्तीत पिंपरी-चिंचवड महापालिकेची धडक कारवाई; नाल्यावरील अतिक्रमण हटवून पाण्याचा प्रवाह केला मोकळा

क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली २ जेसीबी अन् पोलीस बंदोबस्तात मोहीम फत्ते | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड पालिका ‘ॲक्शन मोड’वर! ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाकडून मोरे वस्तीतील नाल्यावरील अनधिकृत बांधकामावर बुलडोझर; नाला केला पूर्णपणे खुला

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान, २३ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरात पावसाळ्यात सखल भागात पाणी साचू नये आणि पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहावा, यासाठी महापालिका प्रशासनाने अतिशय आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने ज्ञान प्रबोधिनी शाळा, मोरे वस्ती, गणेश नगर परिसरातील नाल्यावर करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर धडक निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान नाल्यामध्ये टाकण्यात आलेले अनधिकृत पाइप काढून टाकण्यात आले असून संपूर्ण नाला खुला करण्यात आला आहे.

नाल्यातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखून करण्यात आलेल्या या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने मोठे बळ तैनात केले होते. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या थेट मार्गदर्शनाखाली उपअभियंता हेमंत घोड, कनिष्ठ अभियंता कुंभार, अतिक्रमण निरीक्षक गणेश तीकोणे, बीट निरीक्षक प्रफुल भोकरे, साईनाथ देसाई ऐश्वर्या मासाळ यांनी ही कामगिरी पार पाडली. कारवाईसाठी २ जेसीबी यंत्रांचा वापर करण्यात आला. तसेच अतिक्रमण विभागाचे ५ पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे (MSF) १७ जवान आणि महापालिकेचे ५ मजूर या मोहिमेत सहभागी झाले होते.

पावसाळ्यात जलवाहिन्या, ओढे आणि नाल्यांवरील अतिक्रमणांमुळे अनेक भागांत पाणी तुंबून नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याच्या घटना घडतात. हे टाळण्यासाठी महापालिकेकडून शहरातील सर्व नाले, ओढे व जलवाहिन्यांवरील अनधिकृत अतिक्रमणांविरुद्ध अशाच प्रकारच्या कडक कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

“पावसाळ्यात नाल्यांमधील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहावा, यासाठी शहरातील सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना नालेसफाई आणि नाल्यांवरील अडथळे दूर करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्याअंतर्गतच मोरे वस्तीतील ही कारवाई करण्यात आली असून, अशी मोहीम इतर सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतही सातत्याने राबवली जाईल. नागरिकांनी नाल्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे अनधिकृत पाइप किंवा कोणतेही बांधकाम करू नये. शहरात पूरस्थिती टाळण्यासाठी आणि जलनिस्सारण व्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.”

— डॉ. विजय सूर्यवंशी (आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका)

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!