news
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला वेग; उपआयुक्त सचिन पवार यांच्या पारदर्शक नियोजनाची चर्चालिथुआनियात ‘अकोला बायोएनर्जी’चा बायोमिथेन प्रकल्प कार्यरत; युरोपीय गॅस ट्रान्समिशन नेटवर्कला मिळणार इंधनपिंपळे सौदागर गावठाण कॉर्नरवरील तुटलेल्या चेंबरमुळे वाहनधारक त्रस्त; पिंपरी-चिंचवड पालिकेच्या भोंगळ कारभारावर संतापNEET पेपरफुटी आंदोलन; पोलिसांच्या लाठीमाराविरोधातील तातडीची याचिका सर्वोच्च अन् दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळलीNEET पेपरफुटी अन् २२ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येप्रकरणी अण्णा हजारे संतप्त; पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे सुनावले
Home अमरावती ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲपद्वारे पेन्शनधारकांना एका क्लिकवर सर्व सुविधा; अमरावतीत जिजाऊ सभागृहात पेन्शन अदालत

‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲपद्वारे पेन्शनधारकांना एका क्लिकवर सर्व सुविधा; अमरावतीत जिजाऊ सभागृहात पेन्शन अदालत

अमोल इखे व विजय जवंजाळ यांच्याकडून ॲपचे महत्त्व विषद; शासकीय सेवानिवृत्तांना मिळाला मोठा दिलासा | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ ॲप ठरतेय सुविधांचे माहेरघर; अमरावतीत पार पडली ‘पेन्शन अदालत’!

अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन २३ जुलै २०२६ मॅक्स मंथन विशेष वृत्त:

अमरावती: राज्य शासनाच्या सेवेतील सर्व निवृत्तीवेतनधारक (Pensioners) व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी विकसित करण्यात आलेले ‘महा-उपलब्धी’ (Maha-Uplabdhi) मोबाईल ॲप माहिती आणि आधुनिक सुविधांचे खऱ्या अर्थाने माहेरघर सिद्ध होत आहे. या मोबाईल ॲपची सविस्तर माहिती देणे तसेच पेन्शनधारकांच्या प्रलंबित अडचणी व तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी अमरावती येथील जिल्हा कोषागार कार्यालयातील जिजाऊ सभागृहात ‘पेन्शन अदालत’ उत्साहात पार पडली.

निवृत्तीवेतन कोषागार अधिकारी अमोल इखे यांनी ॲपविषयी माहिती देताना सांगितले की, निवृत्तीवेतनधारकांना आता एका क्लिकवर सुविधा उपलब्ध होत आहेत.दरमहाची पेमेंट हिस्ट्री (पेन्शन तपशील), इन्कम सर्टिफिकेट व फॉर्म-१६ (Form-16), ई-पीपीओ लायब्ररी (e-PPO Library), हयातीचा दाखला (Life Certificate), निवृत्तीवेतनविषयक अद्ययावत शासन निर्णय (GRs) वरिष्ठ कोषागार अधिकारी विजय जवंजाळ यांनी जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या मोबाईल ॲपचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमादरम्यान कनिष्ठ लेखापाल लुकेश मोहोरेआदित्य सुरजुसे यांनी लाईव्ह प्रोजेक्टरच्या माध्यमातून ‘महा-उपलब्धी’ ॲपमधील डिजिटल सेवांचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच लेखालिपिक कोमल गोसावी यांनी निवृत्तीवेतनधारकांना मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्यासाठी ‘महाकोष’ पोर्टलवर (Mahakosh Portal) स्वतःचे लॉगिन करून मोबाईल नंबर अपडेट करण्याबाबत मार्गदर्शन करणारा व्हिडिओ दाखवला.

या पेन्शन अदालतीमध्ये उपस्थित निवृत्तीवेतनधारकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने निरसन केले. अनेक गुंतागुंतीच्या आणि क्लिष्ट प्रकरणांवर जागेवरच सकारात्मक निर्णय घेऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला.

या कार्यक्रमास सहाय्यक संचालक दीपक भिलपवार, सहाय्यक संचालक प्रल्हाद तुमने, अप्पर कोषागार अधिकारी जयश्री उताणेवीरेंद्र दीक्षित प्रमुख उपस्थित होते. कनिष्ठ लेखापाल नयना सोलव यांनी प्रास्ताविक करून कोषागार कार्यालयाची भूमिका विषद केली. श्रुतिका तडस यांनी सूत्रसंचालन केले, तर साजिया मोहम्मद यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ लेखापाल राम जाधव, यामिनी खरड, कनिष्ठ लेखापाल चंदन गजभिये, लेखालिपिक मनीषा भालचक्रे, वर्षा नावाडे यांनी विशेष पुढाकार घेतला.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!